IND vs WI कसोटी मालिकेत इम्पॅक्ट प्लेयरचा मेडल कोणाला मिळाला? ड्रेसिंग रूममध्ये घुमला फक्त एकच नाव!
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका भारताच्या 2-0 अशा विजयाने संपली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने एक डाव आणि 140 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. दुसऱ्या कसोटीत पाहुण्या संघाने झुंज देण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना 7 विकेटने पराभव टाळता आला नाही. पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले, तर दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादव हिरो ठरला. जडेजाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. तथापि, आता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीतील प्रभावशाली (IMPACT PLAYER) खेळाडूचे नाव भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उघड झाले आहे. हे पदक मोहम्मद सिराजला देण्यात आले. बीसीसीआयने एक्स वर या पदक समारंभाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
व्हिडिओमध्ये मोहम्मद सिराज असे म्हणताना दिसत आहेत की, “खरं सांगायचं तर ही कसोटी मालिका माझ्यासाठी खूप खास होती. अहमदाबादमध्ये खेळताना आमच्या वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळाली. पण जेव्हा दिल्लीला आलो, तेव्हा खूप ओव्हर्स टाकावे लागले. प्रत्येक विकेट घेताना असं वाटत होतं की जणू काही 5 विकेट्स घेतल्या.”
“वेगवान गोलंदाज म्हणून जेव्हा तुमच्या मेहनतीला फळ मिळतं, तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि समाधानही मिळतं. त्यात तुम्ही ड्रेसिंग रूमचा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ ठरत असाल, तर तो अनुभव आणखी खास असतो.”
“माझं आवडतं फॉर्मेट कसोटी क्रिकेट आहे. यात शारीरिक आणि मानसिक दोन्ही ताकद लागते. मी असं प्रदर्शन सातत्याने देण्याचा प्रयत्न करणार आहे.”
वेस्ट इंडिजवर मालिका जिंकल्यानंतर अवघ्या 24 तासांत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाली आहे. आता भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. सिराज पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहे.
Comments are closed.