घाऊक महागाई दर सवलत

दोन वर्षांच्या निचांकी पातळीवर

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

घाऊक महागाई दर जुलै महिन्यात उणे 0.58 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ही गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी पातळी आहे. जून 2023 च्या सुरुवातीला ती उणे 4.12 टक्क्यांपर्यंत खाली आली होती. दैनंदिन गरजा आणि अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे. जूनच्या सुरुवातीला ती उणे 0.13 टक्क्यांपर्यंत खाली आली होती. तसेच त्यापूर्वी मे 2025 हा दर 0.39 टक्के आणि एप्रिल 2025 मध्ये 0.85 टक्के होता. दैनंदिन गरजांशी संबंधित प्राथमिक वस्तूंची महागाई उणे 3.38 टक्क्यांवरून उणे 4.95 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. तर अन्न निर्देशांक महागाई दर 0.26 टक्क्यांवरून उणे 2.15 टक्क्यांपर्यंत कमी झाला. इंधन आणि वीजेचा घाऊक महागाई दर उणे 2.65 टक्क्यांवरून उणे 2.43 टक्क्यांपर्यंत वाढला. त्याव्यतिरिक्त उत्पादित वस्तूंचा घाऊक महागाई दर 1.97 टक्क्यांवरून 2.05 टक्क्यांपर्यंत वाढला.

Comments are closed.