Whom did Shrikant Shinde criticize for supporting Shiv Sena in Delhi BJP


भाजपाने महाराष्ट्रानंतर दिल्लीत मिळवलेला विजय हा महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. भाजपाला मिळालेल्या या घवघवीत यशानंतर त्यांच्या सर्व मित्रपक्षांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आप पक्षाचा पराभव झाला असून तब्बल 27 वर्षांनंतर भाजपाला कमळ फुलवण्यात यश आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना स्वतःला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाने महाराष्ट्रानंतर दिल्लीत मिळवलेला विजय हा महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. भाजपाला मिळालेल्या या घवघवीत यशानंतर त्यांच्या सर्व मित्रपक्षांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेल्या विधानामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Whom did Shrikant Shinde criticize for supporting Shiv Sena in Delhi BJP)

शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत म्हटले आहे की, “भ्रष्टाचाराच्या विरोधात जनतेचा जनादेश. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळवून भाजपाने आम आदमी पक्षाच्या खोट्या आश्वासनांना धुडकावून लावले. महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतील जनतेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास मॉडेलवर विश्वास व्यक्त केला आहे. हा विजय एनडीएच्या एकतेचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. तसेच, 2025 च्या अर्थसंकल्पातून देशाला मिळालेला दिलासा देखील या विजयाचे महत्त्व दर्शवितो. ईव्हीएमच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना हा निकाल योग्य उत्तर आहे.” असे श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटले आहे.

हेही वाचा… NCP in Delhi Election : दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पानिपत, उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

तर, “एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या इंडि आघाडीच्या विपरीत, शिवसेना दिल्लीत कोणताही उमेदवार उभा न करून भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि प्रत्येक पातळीवर ‘आप’ विरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार पाठिंबा दिला. हा विजय मोदींच्या नेतृत्वाची आणि लोकशाहीची पुष्टी आहे. भ्रष्ट आम आदमी पक्षाच्या सरकारला योग्य उत्तर दिल्याबद्दल दिल्लीतील जनतेचे अभिनंदन! तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना प्रचंड मेहनतीनंतर मिळालेल्या या ऐतिहासिक विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.” असे शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पण आम्ही कोणताही उमेदवार उभा न करता भाजपाला पाठिंबा दिला असे म्हणत श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला तर नाही ना लगावला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी केंद्रात एनडीएसोबत असून देखील त्यांनी एकूण 23 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. परंतु, त्यांना 0.03 टक्के इतकेच मत मिळवता आले. ज्यामुळे आता या अजित पवारांच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट सुद्धा डप्त झाले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचे अशा प्रकारचे लिहिणे ही राष्ट्रवादीवरील अप्रत्यक्ष टीका तर नाही ना, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.





Source link

Comments are closed.