बरे करा: केळी खाण्यासाठी चिमूटभर नीतिमान एखाद्याचे पेय आहे?

केळी हे भारतीय घरांमध्ये रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच हे फळ खूप प्रिय आहे. सकाळच्या नाश्त्याला, उपवासात किंवा वर्कआउटच्या आधी शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी केळा खाल्ला जातो. पण अनेकदा एक प्रश्न विचारला जातो “केळा खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं योग्य आहे का?” या विषयावर आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र दोघांचं वेगवेगळं मत आहे. चला, यामागचं विज्ञान समजून घेऊया. (why avoid water after eating banana)

आयुर्वेदानुसार केळ्यानंतर पाणी का नको?

आयुर्वेदात केळा हे थंड प्रकृतीचं फळ मानलं जातं. याचा थंड प्रभाव पचनक्रियेवर पडतो. त्यामुळे केळा खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास शरीरातील अग्नी मंद होतो, ज्यामुळे खालील त्रास उद्भवू शकतात:
1) अपचन होणं
2) पोटात गॅस तयार होणं
3) घशात खवखव किंवा सर्दी होणं
4) कफ किंवा खोकला वाढणं

ही समस्या विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये अधिक जाणवते किंवा ज्यांना आधीपासून पचनाशी संबंधित त्रास आहे, त्यांच्यासाठी हे अधिक हानिकारक ठरू शकतं.

पाणी प्यायचंच असल्यास योग्य वेळ कोणती?
जर तहान लागलीच असेल, तर लगेच थंड पाणी पिण्याऐवजी गुनगुणं पाणी पिणं अधिक योग्य ठरतं.तसंच पाणी पिण्यासाठी 20 ते 30 मिनिटांची वाट पाहावी, जेणेकरून केळ्याचे पोषणमूल्य शरीरात नीट शोषले जाईल.

सध्याच्या पोषणतज्ज्ञांचं आणि आधुनिक वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, केळ्यानंतर पाणी पिणं प्रत्येकासाठी घातक नाही. परंतु ज्यांना पचनाची समस्या, गॅस्ट्रिक ट्रबल किंवा ऍसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी थोडा संयम ठेवणं केव्हाही चांगलं. कारण लगेच पाणी प्यायल्याने अन्नपचन प्रक्रिया सैल होते आणि शरीर पोषणशक्ती व्यवस्थितपणे शोषू शकत नाही.

केळा खाण्याचे प्रमुख फायदे
1) शरीराला झपाट्याने ऊर्जा मिळते
2) पचनसंस्थेचं कार्य सुधारतं
3) रक्तदाब नियंत्रणात राहतो
4) हाडं मजबूत होतात
5) हृदयासाठी उपयुक्त
6) स्नायूंना आराम मिळतो

केळा हे अत्यंत पोषक आणि सहज पचणारे फळ आहे. मात्र केळ्यानंतर लगेच थंड पाणी पिणं टाळणं हे आपल्या पचनसंस्थेसाठी हानिकारक आहे. आयुर्वेद आणि विज्ञान दोघेही यासंदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला देतात, विशेषतः ज्यांना पचनाची समस्या आहे त्यांनी हा नियम कटाक्षाने पाळावा.

Comments are closed.