पाकिस्तानचा विराट म्हणवल्या जाणाऱ्या बाबर आझमला का मिळाला आशिया कपमधून डच्चू? कोचने सांगितले मो

एशिया कप 2025 पाकिस्तान पथक: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 17 ऑगस्ट रोजी आशिया कप 2025 साठीचा संघ जाहीर केला. या संघातून पाकिस्तानचे दोन दिग्गज खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांना वगळण्यात आले आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी सलमान अली आगा याची कर्णधारपदी निवड झाली असून शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम आणि फखर जमन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, एकेकाळी पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महत्त्वाचा भाग मानले गेलेले बाबर आणि रिजवान यांना संघात का स्थान मिळाले नाही, याचे कारण मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी स्पष्ट केले.

स्पिनसमोर कमकुवत ठरला स्ट्राईक रेट

संघनिवडीनंतर बाबर आझमला (Why Babar Azam left out of Asia Cup squad) वगळण्यामागील कारण विचारले असता हेसन म्हणाले, “बाबरमध्ये अजून काही क्षेत्रांत सुधारणा करण्याची गरज आहे. तो सातत्याने मेहनत घेत आहे, पण स्पिन गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट खूपच कमी आहे. यंदाच्या अखेरीस तो बिग बॅश लीग खेळणार आहे, जिथे त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. बाबर हा दर्जेदार खेळाडू आहे, त्यामुळे त्याला दुर्लक्षित करणे सोपे नव्हते.”

पीएसएल 2025 मधील निराशाजनक कामगिरी

पाकिस्तान सुपर लीग 2025 मध्ये बाबर आझमने पेशावर झाल्मी संघाकडून 10 सामने खेळत 288 धावा केल्या. पण त्याचा स्ट्राईक रेट फक्त 128.57 एवढाच राहिला, जो आजच्या जलद गतीच्या क्रिकेटसाठी कमी मानला जातो. तसेच नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत बाबर फक्त 3 डावांत 56 धावाच करू शकला, त्यात तो एका डावात शून्यावरही बाद झाला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या निवड समितीने आणि प्रशिक्षक हेसन यांनी बाबर आझम व रिजवान यांना वगळण्याचा मोठा निर्णय घेतला, या निर्णयामुळे आगामी आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ – (Pakistan Squad For Asia Cup 2025)

सलमान अली आघा (कर्नाधर), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमण, हॅरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तालत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यशक्रक्स), मोहमद नवाझ, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमद, मोहमाद शाहीन शाह, शाहीन शाह, आनही सूफियस.

हे ही वाचा –

‘बॉयकॉट, बॉयकॉट Ind vs Pak मॅच बॉयकॉट…’ भारताविरुद्ध नीच कृत्य करणाऱ्या खेळाडूची आशिया कपसाठी पाकिस्तान संघात निवड, देशभरात संतापची लाट

आणखी वाचा

Comments are closed.