Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा?

अनेकदा आपण घाईमध्ये असताना सकाळचा नाश्ता करत नाही. मात्र सकाळचा नाश्ता करणे गरजेचे असते. नाश्ता स्किप केल्याने आपल्या शरीरावर अनेक परिणाम होतात. तसेच उपाशी पोटी आपण चहा घेतो. यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. सकाळचा नाश्ता महत्वाचा का आहे ते जाणून घेऊया..

न्याहारी आवश्यक आहे?

सकाळचा नाश्ता आवश्यक आहे कारण रात्रीचे जेवण झाल्यावर खूप काळ आपण काही खात नाही. त्यामुळे सकाळी पौष्टिक काही खाणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या मते, निरोगी राहण्यासाठी नाश्ता नियमितपणे घेतला पाहिजे, परंतु बहुतेक लोक नाश्त्याकडे जास्त लक्ष देत नाहीत.

नाश्ता न करण्याचे दुष्परिणाम

बहुतेकांचा असा समज असतो की वजन कमी करायचे असेल तर नाश्ता करू नये. मात्र पोषणतज्ञांच्या मते, असे केल्याने शरीरातील चयापचय मंदावते आणि ऊर्जा कमी होते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर सुस्त वाटते. रात्रीच्या जेवणानंतर, आपल्या शरीराला सकाळी काम करण्यासाठी खूप उर्जेची आवश्यकता असते, म्हणून तुम्ही सकाळी ओट्स, कॉर्नफ्लेक्स, दलिया, इडली सांबार सारखा हलका नाश्ता घेतला पाहिजे.

गोड पदार्थ टाळा

शिवाय सकाळी आपल्याला चहा खरी, ब्रेड खाण्याची सवय असते. या नाश्त्याऐवजी, प्रथिने, निरोगी चरबी आणि फायबरने समृद्ध असलेले नाश्ता जसे की अंडी, टोस्ट, नट्स किंवा ग्रीक दही घ्या.

चहा किंवा कॉफी

सकाळी उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी कोमट पाणी, मध किंवा लिंबू पाणी पिणे आरोग्यदायी आहे. तुम्ही त्यासोबत भाजलेले मखाना आणि शेंगदाणे देखील घेऊ शकता.

पुरेसे प्रथिने न घेणे

फक्त ब्रेड किंवा कार्बोहायड्रेट खाल्ल्याने देखील तुम्हाला लवकर भूक लागते. त्याऐवजी, उकडलेले अंडी, ब्रेड ऑम्लेट, दही, पनीर किंवा मूग डाळ चिल्ला इत्यादी प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे चांगले असते.

Comments are closed.