यंदा अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी जॅकेट का नाही घातलं? अजित पवार यांनी दिले उत्तर

राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली. यावेळी एका पत्रकराने तुम्ही अर्थंसकल्प सादर करताना गुलाबी जॅकट का घातले नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी उत्तर देत गुलाबी जॅकेट कधी घालणार याची माहितीही दिली.
अजित पवार यांनी याआधी अनेकदा गुलाबी जॅकेट घातले आहे. त्याची राजकारणात चर्चाही झाली. तसेच त्यांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा रंगली होती. प्रसारमाध्यमांशी अजित पवार संवाद साधत असताना एका पत्रकाराने त्यांना अर्थसंकल्प सादर करताना तुम्ही गुलाबी जॅकेट का घातले नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, अर्थसंकल्प सादर करताना जॅकेट कोणते घालावे, हा प्रश्न मलाही पडला होता. मागच्यावेळी अर्थसंकल्प सादर करताना तेच जॅकेट होते.आता पुन्हा तेच घातले असते तर काहींना वाटले असते की याला दिसरी जॅकेट आहेत की नाही, नेहमी तेच जॅकेट वापरतो. म्हणून आता ते वापरले नाही. आता तुम्ही मला गुलाबी जॅकेटची आठवण करून दिली आहे. तर अर्थसंकल्पाला उत्तर देताना त्या रंगाने जॅकेट नक्की घालीन, असा उत्तरही त्यांनी दिले.
Comments are closed.