Periods : मासिक पाळीत चेहऱ्यावर पिंपल्स का येतात?

महिलांना मासिक पाळी दर महिन्याला येणारी गोष्ट आहे. वयाच्या साधारण 12 वर्षापासून प्रत्येक महिलेला या टप्प्यातून जावे लागते. या दिवसात पोटदुखी, कंबरदुखी, मूड स्विंग्स अशा समस्या जाणवतात. यासोबतच आणखी एक समस्या प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. बहुतांश जणींना मासिक पाळीत या त्रासाचा सामना करावा लागतो. या दिवसात येणारे मुरुम हे सिस्टिक ऍक्ने असतात. त्यामुळे या दिवसात आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे असते. पण, याच दिवसात हे पिंपल्स का येतात? यामागची कारणे काय आहेत? चला तर मग आजच्या लेखातून आपण जाणून घेऊयात यासर्वाची उत्तरे

हार्मोनल बदल –

मासिक पाळीच्या आधी आणि सुरू असताना शरीरात हार्मोनल बदल होतात. या हार्मोनल बदलांचा थेट परिणाम शरीरावर होतो. विशेष करून, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार झाल्यामुळे मासिक पाळी दरम्यान चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

अतिरिक्त तेल –

मासिक पाळीत, शरीरात जास्त तेल तयार होऊ शकते. हे तेल पोअर्समध्ये अडकून पिंपल्स येऊ शकतात. विशेष करून ज्यांची त्वचा तेलकट असते, अशा महिलांना मासिक पाळीत पिंपल्सची समस्या जाणवते.

मासिक पाळी दरम्यान मुरुमांच्या चेह on ्यावर दिसतात

ताण –

मासिक पाळीत होणाऱ्या त्रासामुळे अनेक महिलांना ताण येतो. ताणामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. ताणामुळे शरीरातील कोर्टिसोल हार्मोन्सचा स्तर वाढतो, ज्याचा नकारात्मक परिणाम त्वचेवर होतो.

पचन –

मासिक पाळीच्या काळात पचनसंस्थेवर परिणाम होतो. पचनक्रिया खराब झाल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात.

तेलकट पदार्थ –

मासिक पाळी जास्त गोड किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्सचा त्रास होऊ शकतो.

काय काळजी घ्याल?

  • मासिक पाळीत स्वच्छता राखावी.
  • दररोज चेहरा स्वच्छ करावा.
  • चेहरा स्वच्छ केल्यावर मॉइश्चरायजर लावावे.
  • मासिक पाळीत मेकअप करणे टाळा.
  • पौष्टिक पदार्थ खावेत.
  • भरपूर पाणी प्यावे.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=fzguf-gsqk

Comments are closed.