आशिया कपच्या इतिहासात भारत-पाकिस्तान फायनल सामना नाही, यामागचं खरं रहस्य काय?
आशिया कपच्या इतिहासात भारत-पाकिस्तान सामन्याची सर्वात जास्त चर्चा होते, पण एक गोष्ट आजवर घडलेली नाही. दोन्ही संघ कधीच अंतिम फेरीत आमनेसामने आलेले नाहीत. चाहत्यांच्या नजरा नेहमी या “हाय-वोल्टेज सामन्या” कडे लागलेल्या असतात, मात्र फॉर्मेट, नशीब आणि इतर संघांची ताकद या तिन्ही कारणांमुळे ही ऐतिहासिक टक्कर फाइनलमध्ये घडू शकली नाही.
1. फॉर्मेटचा बदल
आशिया कपची सुरुवात 1984 साली झाली. त्या काळी स्पर्धा राउंड-रोबिन पद्धतीने खेळली जायची. विजेता ठरवण्यासाठी वेगळा अंतिम सामना घेतला जात नसे. त्यामुळे भारत-पाकिस्तानला थेट फाइनलमध्ये भिडण्याची संधीच मिळाली नाही.
2. सुपर फोर आणि गट फेरीचं गणित
1990 च्या दशकानंतर फाइनलची प्रथा सुरू झाली, पण त्यावेळी भारत-पाकिस्तान बहुतेक वेळा सुपर फोर किंवा गट फेरीतच एकमेकांना भिडले. अनेकदा एका संघाचा प्रवास तिथेच संपला आणि दुसरा संघ फाइनल गाठला. उदाहरणार्थ, 2008 मध्ये दोन्ही संघ दोनदा सुपर फोरमध्ये भिडल. भारताने एक सामना जिंकला, पाकिस्तानने दुसरा. मात्र फाइनल भारत-श्रीलंका दरम्यान खेळला गेला.
3. श्रीलंकेचं वर्चस्व
आशिया कपच्या प्रवासात श्रीलंका हा कायमचा गडबड करणारा घटक ठरला. त्यांनी अनेकदा भारत-पाकिस्तान दोघांनाही मागे टाकत अंतिम फेरी गाठली आणि किताब पटकावला. त्यामुळे दोन्ही दिग्गज एकत्र फाइनलमध्ये पोहोचणं कठीण झालं.
४. अनिश्चितता आणि कामगिरीतील चढ-उतार
भारत-पाकिस्तान दोन्ही संघांनी बर्याचदा चांगली सुरुवात केली पण निर्णायक सामन्यात पराभव पत्करावा लागला. विशेषतः पाकिस्तानचा सुपर फोरमध्ये घसरलेला फॉर्म अनेक वेळा त्यांना फाइनलपासून दूर ठेवत गेला.
थोडक्यात आशिया कपच्या प्रवासात भारत-पाकिस्तान फाइनल भिडत नसल्यामागे फॉर्मेट, नशीब आणि श्रीलंका सारख्या तिसऱ्या संघाची ताकद ही कारणं ठळकपणे दिसून येतात. त्यामुळे आजवर चाहत्यांना हा महा-समर फाइनलमध्ये नाही तर फक्त गट फेरी किंवा सुपर फोरमध्येच पाहायला मिळालाय.
Comments are closed.