CSK vs PBKS: धोनी आजच्या सामन्यात का खेळत नाही? चेन्नई सुपर किंग्सच्या निर्णयामागचं मुख्य कारण समोर

आयपीएल 2026 च्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टॉसच्या वेळी सर्वांच्या नजरा सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडवर (Ruturaj Gaikwad) होत्या, कारण धोनी आजचा सामना खेळणार की नाही, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती.

कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितले की, टीममध्ये एक बदल करण्यात आला आहे. मॅथ्यू शॉर्टच्या जागी प्रशांत वीरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. मात्र, एम.एस. धोनी या सामन्यात खेळणार नाही. धोनी राजस्थान रॉयल्सविरुद्धचा पहिला सामनाही खेळला नव्हता. धोनी आज पंजाबविरुद्ध का खेळत नाहीये, त्याचे कारण खालीलप्रमाणे आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एम.एस. धोनी (MS Dhoni) आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी सराव करताना जखमी झाला होता. सीएसकेने अधिकृत पत्रक जारी करून माहिती दिली होती की, धोनीला ‘काफ इंजरी’ (पिंडलीला दुखापत) झाली आहे. या दुखापतीमुळे तो किमान 2 आठवडे मैदानापासून लांब राहू शकतो. याच दुखापतीमुळे धोनी आज चेन्नई विरुद्ध पंजाब सामन्यात खेळत नाहीये.

Comments are closed.