लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय! स्वत:च्या खेळाडूंवर घातली बंदी

पीसीबीने डब्ल्यूसीएलवर ब्लँकेट बंदी जाहीर केली: इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 च्या अंतिम सामन्यात साउथ आफ्रिका चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा दारूण पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. मात्र या स्पर्धेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक धक्कादायक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.

पीसीबीचा ब्लँकेट बॅन, WCLमध्ये भाग घेण्यास कायमस्वरूपी नकार!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केलं आहे की, पाकिस्तानी संघ किंवा त्यांचे कोणतेही खेळाडू भविष्यात WCL स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. हा निर्णय PCBने का घेतला, यामागे एक मोठं कारण म्हणजे, भारताचा पाकिस्तानविरोधातील सहभागावर बहिष्कार टाकणे.

भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 च्या गटपातळीतील सामन्यात भारत चॅम्पियन्स संघाने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. हीच गोष्ट सेमीफायनलमध्येही घडली. भारतीय संघाने, ज्यामध्ये शिखर धवन, युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि हरभजन सिंग यांचा समावेश होता, पाकिस्तानविरोधात खेळण्यास स्पष्ट नकार दिला. हा निर्णय भारताच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पीसीबीची नाराजी, आयोजकांवर लावले गंभीर आरोप

पीसीबीने आयोजकांवर भारताला समर्थन दिल्याचा आरोप करत म्हटलं की, सामना न खेळवूनही भारताला गुण देण्यात आले, जे अन्यायकारक होते. या पक्षपाती वागणुकीमुळे पीसीबीने संपूर्ण स्पर्धेवर ‘ब्लँकेट बॅन’ जाहीर केला आहे.

दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरी जिंकली

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 च्या अंतिम सामन्यात, पाकिस्तान चॅम्पियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 195 धावा केल्या. अनुभवी सलामीवीर शरजील खानने संघासाठी 76 धावा केल्या तर उमर अमीनने नाबाद 36 धावांचे योगदान दिले. आसिफ अलीने 28 धावा केल्या.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने एक विकेट गमावून सामना जिंकला. एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्ससाठी 120 धावांची नाबाद खेळी केली आणि त्याच्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या हंगामातील हे त्याचे तिसरे WCL शतक आहे. जेपी ड्युमिनीने नाबाद 50 धावांचे योगदान दिले.

हे ही वाचा –

Suresh Raina : WCL फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव, सुरेश रैनाचा सडेतोड टोला, म्हणाला, ‘आमच्यासमोर आले असते, तर मैदानातच…’

आणखी वाचा

Comments are closed.