मुंबईनंतर गुजरातने बदलला कर्णधार; शुभमन गिल संघातून OUT, कोण झालं नवीन कर्णधार?

शुभमन गिल जीटी विरुद्ध आरआर आयपीएल 2026 : आयपीएलमधील आजच्या डबल हेडर सामन्यात गुजरात टायटन्स संघात मोठा बदल पाहायला मिळाला. गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) हा या सामन्यातून बाहेर झाला आहे. नाणेफेकीवेळी हा बदल स्पष्ट झाला, गिलच्या अनुपस्थितीत रशीद खान याने टॉस केला. त्याआधी दुपारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik pandya) सामन्यातून बाहेर झाला. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना टॉससाठी मैदानात उतरला होता.

मुंबईनंतर गुजरातने बदलला कर्णधार

नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राशिद खान म्हणाला की, आम्हाला प्रत्यक्षात आधी गोलंदाजी करायची होती. गिलला स्नायूंमध्ये ताण (मसल स्ट्रेन) आला असून तो लवकरच पुनरागमन करेल, अशी आशा आहे. तसेच कुमार कुशाग्र आज आपला पहिला सामना खेळत असून, त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचेही त्याने सांगितले. मागील सामन्यात संघाने चांगला खेळ केला होता आणि आजही 100 टक्के कामगिरी देण्याचा निर्धार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

कोण आहे कुमार कुशाग्र?

झारखंडमधील बोकारो येथील 21 वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज कुमार कुशाग्र आज गुजरात टायटन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विशेष आकर्षण ठरला आहे. 65 लाख रुपयांच्या किफायतशीर किमतीत संघात सामील झालेला कुशाग्र हा यष्टिरक्षक-फलंदाज असून मधल्या फळीत संघाला मजबुती देण्याची क्षमता त्याच्यात आहे. MS धोनीच्या झारखंड राज्यातूनच तो येत असल्याने चाहत्यांच्या त्याच्याकडे विशेष नजरा लागल्या आहेत. बोकारोच्या गल्लीपासून आयपीएलच्या मोठ्या मंचापर्यंतचा त्याचा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी मानला जात आहे.

राजस्थान रॉयल्समध्ये दोन बदल

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने संघात दोन बदल केल्याची माहिती दिली. त्यानुसार, तुषार देशपांडे याला बृजेशच्या जागी संधी देण्यात आली आहे, तर शुभम दुबे याला रवि बिश्नोईच्या जागी संघात स्थान मिळाले आहे.

गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग-11

कुमार कुशाग्रा, साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान (कर्नाधर), कागिसो रबाडा, अशोक शर्मा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.

राजस्थान रॉयल्स संघाची प्लेइंग-11

यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.

हे ही वाचा –

राजधानीत समीर रिजवी नावाचं वादळ; मुंबईची ‘पलटन’ चारीमुंड्या चीत, दिल्ली टॉपवर; कर्णधार सूर्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

आणखी वाचा

Comments are closed.