स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट का गुंडाळण्यात आला? शरद पवारांची सूचना होती का? अमोल कोल्हे

अमोल कोल्हे: सध्या राज्यासह देशभरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट चर्चेत आहे. शिवप्रेमींनी ‘छावा’ सिनेमाला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये ‘छावा’ सिनेमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (swarajyarakshak sambhaji) मालिकेची चांगलीच चर्चा आहे. त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डॉ. अमोल कोल्हेंनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता, सोशल मिडियावरती आणखी काही प्रश्न या मालिकेबाबत उपस्थित करण्यात आले होते, या मालिकेत छत्रपती शंभूराजेंना कैद झाल्यानंतर पुढे औरंगजेबाने त्यांचा कसा छळ केला हे दाखवण्यात आलं नाही. या मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला अशी चर्चा रंगली होती. याविषयी डॉ. अमोल कोल्हेंनी त्यांच्या युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून मोठा खुलासा केला आहे. त्याचबरोबर शरद पवारांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवावा, अशी कोणतीही सूचना दिली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज अमोल कोल्हे यांनी दिली आहेत.

“हो माझ्यावर दबाव”

डॉ. अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये हा खुलासा केला आहे. “स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का?”, “स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कोणाचा दबाव होता का?” या सध्याच्या चर्चेतल्या प्रश्नांना उत्तर देताना अमोल कोल्हेंनी खुलासा करताना म्हणाले, “होय..! स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर आणि माझ्या टीमवर दबाव होता.”

शरद पवारांनी कोणती सूचना दिली होती का?

https://www.youtube.com/watch?v=ubsaczhil6m

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवावा, अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती. मुळात त्यांनी ही मालिका कोरोना काळात पुनर्प्रक्षेपन केलं तेव्हा पाहिली, त्यामुळं 2019च्या लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवलं जातंय, याची कल्पना पवार साहेबांना अजिबात नव्हती. असा खुलासा कोल्हेंनी केला आहे. शरद पवारांनी कधीही शब्दानंही अमुक प्रसंग दाखवा किंवा दाखवू नका असं सांगितलं नव्हतं, तेव्हा शरद पवारांनी ही मालिका पाहिली देखील नव्हती. शरद पवारांनी मालिका पाहिली ती कोवीडच्या काळामध्ये जेव्हा मालिकेतं पुन्हा प्रक्षेपण झालं त्यावेळी त्यांनी ही मालिका पुन्हा पाहिली. त्यामुळे यामध्ये शरद पवारांचा हात होता आणि कोणालातरी खूश करण्यासाठी मालिकेचा शेवट दाखवला नाही असा खोटा प्रचार करणं हा धादांत खोटा प्रचार असल्याचंही यावेळी कोल्हेंनी म्हटलं आहे.

डॉ. अमोल कोल्हेंनी केलेल्या या धक्कादायक खुलासा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी अमोल कोल्हेंवर नेमका कोणाचा दबाव होता? मालिकेचा शेवट का गुंडाळण्यात आला? या सर्व प्रश्नांची उत्तरं अमोल कोल्हे युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना देणार आहेत. अमोल कोल्हे कोणता खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सध्या अमोल कोल्हे हे राजकारणात सक्रीय आहेत. सध्या राजकीय क्षेत्रात विविध जबाबदारी सांभाळत असल्याने अमोल कोल्हे अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत.

अमोल कोल्हेंनी कोणते मुद्दे मांडले?

होय, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट असा दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता.

1 – माझ्यावर माध्यमाचा दबाव होता. मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचे पालन करणं बंधनकारक असतं. त्या नियमांमुळं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला.

2 – नैतिकतेचा ही माझ्यावर दबाव होता. सलग चाळीस दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील आबालवृद्धांवर याचा परिणाम दिसला असता. हा विचार आम्ही करणं गरजेचं होतं.

3 – आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतू वर प्रश्न उपस्थित केले गेले. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता का? असा प्रश्न मी आमच्या हेतुवर शंका घेणाऱ्यांना विचारतोय? मला अशा ट्रोलर्सची कीव येते.

4 – ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवावा, अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती. मुळात त्यांनी ही मालिका कोरोना काळात पुनर्प्रक्षेपन केलं तेव्हा पाहिली, त्यामुळं 2019च्या लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवलं जातंय, याची कल्पना पवार साहेबांना अजिबात नव्हती. असा खुलासा कोल्हेनी केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.