सुपर ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशीला संधी का नाही? जितेश शर्माचा अनपेक्षित निर्णय

Asia Cup Rising Star 2025: पहिल्या सेमाफायनल सामन्यात बांगलादेशने 20 षटकांत 6 गडी गमवून 194 धावा केल्या, ज्यामुळे भारतीय संघासाठी विजयाची धावसंख्या 195 होती. भारताने 194 धावा केल्या, पण सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. चाहत्यांना वाटत होतं की भारतीय संघ सुपर ओव्हर आरामात जिंकेल. पण खेळाडूंच्या चुकीच्या निर्णयांमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

स्पर्धेत वैभव सूर्यवंशी फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं. युएईविरुद्ध शतकी खेळी, पाकिस्तानविरुद्ध 45 धावा आणि या सामन्यातही आक्रमक सुरुवात करून संघाला पाठबळ दिलं. त्यामुळे चाहत्यांना वाटलं की सुपर ओव्हरमध्ये पॉवर हिटिंगसाठी त्याला संधी मिळेल. पण त्याला डावात आणलं नाही.

सुपर ओव्हरमध्ये भारतीय कर्णधार जितेश शर्मा आणि नमन धीर उतरले. पहिल्या चेंडूवरच जितेश शर्माला क्लिन बोल्ड केलं. दुसऱ्या चेंडूवर आशुतोष शर्मालाही झेल जाऊन परतवण्यात आलं. सुपर ओव्हरचा खेळ फक्त दोनच चेंडूत संपला. बांगलादेशला फक्त एक धाव हवी होती, आणि त्यानंतर वाइडने सामना संपवला.

जितेश शर्माने सामन्यानंतर सांगितलं की वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या पॉवरप्ले मध्ये आक्रमक खेळतात. डेथ ओव्हर्समध्ये मी आणि आशुतोष शर्मा अधिक प्रभावी ठरतो, त्यामुळे संघ व्यवस्थापन आणि मी कर्णधार म्हणून हा निर्णय घेतला.

उपांत्य फेरीत हा पराभव चाहत्यांसाठी धक्का देणारा ठरला. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी सुपर ओव्हरमध्ये इतकी निष्काळजी फलंदाजी कशी केली, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

Comments are closed.