टीम बदलल्यामुळे रवींद्र जडेजाच्या फीमध्ये कपात का झाली? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण
भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आता आयपीएलमध्ये जर्सी बदलून खेळताना दिसणार आहे. पुढील हंगामात तो पिवळ्या नव्हे तर गुलाबी जर्सीत धमाल करताना दिसेल. आयपीएल 2026 (IPL 2026) आधी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी ट्रेड झाली आहे.
चेन्नईने जडेजा आणि सॅम करनच्या (Sam Karan) बदल्यात राजस्थान रॉयल्स कडून संजू सॅमसनला आपल्या टीममध्ये घेतले आहे. विशेष म्हणजे चेन्नईने संजूला त्याची जुनीच किंमत म्हणजे 18 कोटीमध्येच सामील केले. पण दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने जडेजाची फी कमी केली आहे.
मागील सीजनमध्ये चेन्नई कडून 18 कोटी मिळवणाऱ्या जडेजाला राजस्थान रॉयल्सने 14 कोटींमध्ये ट्रेड केले. यानंतर क्रिकेट जगतात खळबळ उडाली आणि चाहते विचारू लागले की, जडेजाने 4 कोटी कमी पगारात टीम बदलण्यास का मान्यता दिली?
आयपीएलमध्ये नवीन फ्रँचायझीत जाण्यापूर्वी खेळाडू आणि टीममध्ये परस्पर सहमतीने फी ठरवली जाते. म्हणजेच जडेजा आणि RR व्यवस्थापनामध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली आणि दोघांचीही सहमती होऊन 14 कोटी फी निश्चित करण्यात आली. यात BCCI किंवा मागील चेन्नईचा काहीही सहभाग नाही.
जडेजाच्या फी कटमुळे राजस्थान रॉयल्सला 3 महत्त्वाचे खेळाडू मिळाले
रवींद्र जडेजा – 14 कोटी
सॅम करन – 2.4 कोटी
डोनोव्हन फरेरा – 1 कोटी
हे तिघे मिळूनही फ्रँचायझीकडे 60 लाख रुपये शिल्लक राहतात.
Comments are closed.