KKR vs MI: रिंकू सिंगला का मिळाली केकेआरची कॅप्टन्सी? यामागचं धक्कादायक कारण समोर!
इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सला ६ विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरला झंझावाती सुरुवात करून देणारा कर्णधार अजिंक्य रहाणे दुखापतग्रस्त होऊन मैदाबाहेर गेला. त्यानंतर सामन्याच्या मध्यात रिंकू सिंहने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. वर्ष २०१८ मध्ये आपल्या आयपीएल पदार्पणाच्या हंगामापासूनच केकेआरचा भाग असलेल्या रिंकूने यापूर्वी कधीही टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवले नव्हते.
कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी रिंकू सिंहबद्दल बोलताना सांगितले की, ‘मला वाटते की हे खूपच योग्य आहे, कारण केकेआरमधील माझी पहिली आठवण रिंकू सिंहसोबत काम करण्याची आहे, जेव्हा मी सपोर्ट स्टाफचा भाग बनलो होतो. गेल्या काही वर्षांत आपण पाहिले आहे की तो केवळ एक क्रिकेटपटू म्हणून नाही, तर एक नेता म्हणूनही विकसित झाला आहे. गेल्या काही वर्षांतील त्याची कामगिरी स्वतःच सर्व काही सांगते, परंतु मैदानाबाहेरही संघातील खेळाडू त्याचा खूप आदर करतात.’
मुंबई इंडियन्सच्या डावा दरम्यान सुरुवातीलाच केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला दुखापत झाल्यामुळे मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर संघाचा उपकर्णधार रिंकू सिंहने रहाणेच्या अनुपस्थितीत सामन्यादरम्यान ऑन-फिल्ड कर्णधारपद सांभाळले. ही घटना चौथ्या षटकाच्या शेवटी घडली, जेव्हा कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करताना रहाणे अचानक खाली पडला आणि वेदनेने विव्हळताना दिसला. अद्याप दुखापतीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, परंतु सामन्यादरम्यान समालोचकांनी (Commentators) हे क्रॅम्प्सचे (स्नायू आखडणे) प्रकरण असल्याचे सांगितले होते. मात्र, केकेआरचे फिजिओ तातडीने मैदानावर पोहोचले आणि त्यांनी दुखापतीची पाहणी केली. रहाणेचा त्रास पहिल्या नजरेत वाटला होता त्यापेक्षा जास्त गंभीर दिसत होता. संघातील सहकाऱ्यांनी त्याला उठण्यास मदत केली, त्यानंतर रहाणेने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला आणि रिंकू सिंहला सामन्याच्या मध्यात संघाची धुरा सांभाळावी लागली.
Comments are closed.