शुबमन गिलला वगळण्यामागचं कारण काय? कर्णधार सूर्यकुमार यादवने केला मोठा खुलासा
2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, त्यात सर्वांत मोठा धक्का म्हणजे उपकर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) संघात स्थान मिळालेले नाही. गिल गेल्या काही काळापासून टी-20 संघात महत्त्वाच्या भूमिकेत होता, तरीही त्याला डच्चू देण्यात आला. या निवडीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav and Ajit Agarkar) आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी गिलला बाहेर ठेवण्यामागचे ‘इनसाइड स्टोरी’ सांगितली.
कर्णधार सूर्याच्या मते, हा निर्णय गिलच्या फॉर्ममुळे नाही, तर संघाच्या ‘कॉम्बिनेशन’ (रचनेमुळे) घेतला गेला आहे. सूर्या म्हणाला, आम्हाला टॉप ऑर्डरमध्ये एका यष्टीरक्षकाची (विकेटकीपर) गरज होती, त्यामुळे गिलच्या जागी ईशान किशनला संधी दिली. हा फॉर्मचा विषय नाही. आम्हाला पॉवरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात हवी आहे आणि खालच्या फळीत रिंकू सिंग किंवा वॉशिंग्टन सुंदरसारखे खेळाडू हवे होते. या रणनीतीमुळेच आम्ही ईशान किशनसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
निवडकर्ते अजित आगरकर यांनीही ‘कॉम्बिनेशन’वरच भर दिला. गिलच्या जागी अक्षर पटेलला पुन्हा उपकर्णधार का बनवले, याचे कारणही त्यांनी दिले. आगरकर म्हणाले, शुबमन गिल हा दर्जेदार खेळाडू आहे यात शंकाच नाही, पण संघाच्या रचनेसाठी कोणाला तरी बाहेर बसावेच लागते.
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जेव्हा ईशान किशनसारखा (Ishan kishan) कीपर टॉप ऑर्डरमध्ये येतो, तेव्हा समीकरणे बदलतात. अक्षर पटेल याआधीही टी-20 चा उपकर्णधार होता, त्यामुळे गिल संघात नसल्याने ही जबाबदारी पुन्हा अक्षरकडे सोपवण्यात आली आहे.
Comments are closed.