VT VRR हे विमान ग्राउंड का करण्यात आलं नाही? VSR कंपनीच्या विमानातील बिघाडावरून रोहित पवार यांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी VSR कंपनीबाबत पुन्हा एकदा स्पष्टपणे आपले मत मांडत VT VRR हे विमान ग्राउंड का करण्यात आलं नाही? असा थेट सवाल केला आहे. कदाचित या विमानाचा मालक कुणीतरी अति मोठी व्यक्ती असावी. याची दखल कुणी घेणार आहे का? यावर बोलण्याची VSR च्या मालकात हिंमत आहे का? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.
#VSR कंपनीची विमाने अत्यंत भंगार आणि धोकेदायक असल्याचं मी पुराव्यासकट सांगत आलो आहे. आज तीच बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली असून VSR कंपनीचे VT VRR हे विमान दिल्लीवरून दुबई जाणार होतं, परंतु टेकऑफ पूर्वीच पंखांच्या flap मध्ये बिघाड झाल्याने विमान टेक ऑफ घेऊ शकलं नाही. अजितदादांच्या…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 25 एप्रिल 2026
याबाबत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, #VSR कंपनीची विमाने अत्यंत भंगार आणि धोकेदायक असल्याचं मी पुराव्यासकट सांगत आलो आहे. आज तीच बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली असून VSR कंपनीचे VT VRR हे विमान दिल्लीवरून दुबईला जाणार होतं, परंतु टेकऑफ पूर्वीच पंखांच्या flap मध्ये बिघाड झाल्याने विमान टेक ऑफ घेऊ शकलं नाही. अजितदादांच्या अपघातात असलेल्या Learjet 45 XR याच मॉडलचं हे विमान होतं. अजितदादांच्या अपघातानंतर VSR ची चार Learjet विमाने ग्राउंड करण्यात आली, VT VRR हे विमान ग्राउंड का करण्यात आलं नाही? कदाचित या विमानाचा मालक कुणीतरी अति मोठी व्यक्ती असावी. याची दखल कुणी घेणार आहे का? यावर बोलण्याची VSR च्या मालकात हिंमत आहे का? असे सवाल त्यांनी केले आहेत.
Comments are closed.