सलमान खानच्या Battle of Galwan चित्रपटाचे नाव का बदलले? जाणून घ्या
अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपटाचे मूळ नाव ‘बॅटल आॅफ गलवान’ होते. मात्र आता या चित्रपटाचे नाव आता बदलून ‘मातृभूमी’ असे करण्यात आले आहे. दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी सांगितले की, चित्रपटाचे नाव बदल करण्याचा निर्णय हा एका रात्रीत झाला नसून, खूप विचारांती हा निर्णय घेण्यात आलेला आहे. निर्मात्यांना चित्रपटाचा फोकस केवळ युद्धावर ठेवायचा नव्हता. नवीन नाव मातृभूमी हे देशप्रेम, बलिदान आणि शांततेचा व्यापक संदेश देण्यासाठी ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट 2020 मधील गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारीत आहे. त्याकाळी हा संघर्ष हिंदुस्थान आणि चीन दरम्यान फार मोठ्या प्रमाणावर पेटला होता. ही घटना अत्यंत संवेदनशील असल्यामुळे, बॅटल आॅफ गलवान हे नाव थेट घेणे योग्य नाही असे मत झाल्याने, चित्रपटाचे नाव बदलण्यात आले.
जगभरात सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे नाव अधिक भावनिक आणि मानवतावादी संदेश देणारे असावे, असे निर्मात्यांना वाटले. त्यामुळे May War Rest in Peace ही टॅगलाईनही जोडण्यात आली आहे. गलवान खोऱ्यातील या संघर्षामध्ये हिंदुस्थानी सैन्याचे कर्नल बी. संतोष बाबू आणि इतर 20 सैनिक शहीद झाले होते. चित्रपटात सलमान खान कर्नल संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहेत, तर अभिनेत्री चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Comments are closed.