यशस्वी जयस्वालला डच्चू का मिळाला? 3 सामन्यांमधील 2 दणदणीत विजयांनंतरही पत्ता कट; समोर आलं मोठं कारण!
भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. यासह ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह पुनरागमन करताना दिसून येणार आहेत. तर यशस्वी जैस्वालला वनडे संघातून बाहेर करण्यात आलं आहे. दरम्यान यशस्वी जैस्वालला संघाबाहेर करण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.
यशस्वी जैस्वालने तिन्ही फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावे शतकाची नोंद आहे. पण त्याला फार सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं सलामीवीर म्हणून आपलं स्थान निश्चित केलं आहे. पण त्याचं वनडे क्रिकेटमधील स्थान तळ्यात मळ्यात राहिलं आहे. पण गेल्या 3 वनडे सामन्यांमध्ये त्याने 2 शतकं झळकावली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 70 पेक्षा जास्त आहे. असं असतानाही त्याचा इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.
यशस्वी जैस्वालला इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान न मिळण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. आधी विराट कोहली या संघाचा भाग होता. पण विराटला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे यशस्वी जैस्वालचा वनडे संघात समावेश करण्यात आला होता. पण इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी विराट कोहलीला संघात स्थान देण्यात आलं आहे. विराट असताना जैस्वाल कितव्या क्रमांकावर खेळणार? असा प्रश्न आहे. त्यामुळे जैस्वालला डच्चू देण्यात आला आहे. जैस्वाल अजूनही पूर्णपणे संघाबाहेर झालेला नाही. जर एखादा खेळाडू संघाबाहेर झाला, तर त्याच्याऐवजी जैस्वालचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
Comments are closed.