WI vs AUS – रोवमैन पॉवेलने फक्त 28 धावा केल्या आणि ‘युनिव्हर्सल बॉस’चा विक्रम उद्ध्वस्त केला

वेस्ट इंडिजचा संघ म्हणचे तोडफोड फलंदाजी. ड्वेन ब्राव्हो, पोलार्ड, निकोलस पुरन, ख्रिस गेल सारख्या अनेक करेबियन खेळाडूंनी टी-20 फॉरमॅटमध्ये गोलंदाजांची वेळोवेळी शाळा घेत त्यांची मनसोक्त धुलाई केली आहे. त्यांच्या या पंक्तीत आता रोवमैन पॉवेलचा सुद्धा समावेश झाला आहे. सध्या वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. चौथ्या टी-20 सामन्यामध्ये रॉवमैनने फक्त 22 चेंडूंमध्ये 28 धावा केल्या आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडित काढला. रोवमैन पॉवेल आता टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने आता ख्रिस गेलला मागे टाकलं आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर निकोलस पुरनचा समावेश आहे. निकोलस पुरनने आंतरराष्ट्री क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचा विक्रम अजूनही कायम आहे. त्याने वेस्ट इंडिजकडून खेळताना 2275 धावा केल्या आहेत. तर नुकताच दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झालेला रॉवमैन पॉवेलने आतापर्यंत 1925 धावा केल्या आहेत. पहिल्या क्रमांकावर उडी मारण्यासाठी त्याला 350 धावांची गरज आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने 1899 धावा, चौथ्या क्रमांकावर इविन लुईस 1782 धावा आणि पाचव्या क्रमांकावर ब्रँडन किंग 1648 धावा या खेळाडूंचा समावेश आहे.
त्याच्या कठोर परिश्रम आणि दीर्घायुष्याचा एक करार #Meninmaroo? 👌#Wivsaus | #Fullahenergy | #Meninmaroo pic.twitter.com/rac8lbp40a
– विन्डिस क्रिकेट (@Windiescricket) 27 जुलै, 2025
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकांमध्ये आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आणि 3 विकेटने सामना जिंकला. या विजयासह पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने 4-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
Comments are closed.