कसोटी क्रिकेटमधील सर्वात 'वाईट' निर्णय? विआन मुल्डरच्या 'या' निर्णयाने चाहतेही थक्क! वाचा सविस्तर
वियान मुलडरने मोठ्या विक्रमांची संधी गमावली: इतिहास रचण्याची किंवा लिहिण्याची संधी नशिबाने दररोज मिळत नाही. म्हणतात ना, संधी हातात आली की चौकार मारलाच पाहिजे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार विआन मुल्डरकडेही नवा इतिहास लिहिण्याची सुवर्णसंधी होती. मुल्डरला ती संधी मिळाली होती, ज्याचे स्वप्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फक्त स्वप्नातच पाहतात. मुल्डरकडे कसोटी क्रिकेटच्या विक्रमपुस्तकात आपले नाव कायमचे अमर करण्याची संधी होती. (South Africa vs Zimbabwe Test)
367 धावांवर नाबाद असताना दुपारच्या जेवणासाठी मैदानाबाहेर परतलेल्या मुल्डरच्या मनात काय आले कोणास ठाऊक, पण त्याने डाव घोषित करण्याची घोषणा केली. (Wiaan Mulder declaration Test) विआनकडे ब्रायन लाराचा 400 धावांचा रेकाॅर्ड मोडण्याची सुवर्णसंधी होती, परंतु त्याने असा निर्णय घेतला, जो पाहून जगभरातील क्रिकेट चाहते थक्क झाले. (Wiaan Mulder 367 not out)
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विआन मुल्डर दुसऱ्या दिवशी एकापाठोपाठ एक रेकाॅर्ड मोडत होता. मुल्डर तिहेरी शतक झळकावणारा जगातील पहिला कर्णधार बनला, तर यानंतर त्याने 350 धावांचा टप्पाही पार केला. मुल्डरची धडाकेबाज फलंदाजी पाहून असे वाटत होते की तो ब्रायन लाराचा रेकाॅर्ड सहज मोडेल. क्रिकेटप्रेमी चाहत्यांचे लक्ष एकदम दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे कसोटी सामन्यावर केंद्रित झाले होते. मुल्डर 367 धावांवर होता आणि उत्कृष्ट फलंदाजी करत होता. मात्र, त्याच वेळी दुपारच्या जेवणाची वेळ झाली. आता सर्वांना वाटले की दुपारच्या जेवणानंतरच्या पहिल्या तासातच मुल्डर लाराचा ऐतिहासिक रेकाॅर्ड मोडेल.
प्रत्येकाला असेच वाटत होते की मुल्डर कसोटीतील सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनेल. पण दुपारच्या जेवणाची सुट्टी संपण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका संघाने डाव घोषित करण्याची घोषणा केली. मुल्डर 367 धावांवर नाबाद राहिला आणि लाराचा रेकार्ड थोडक्यात बचावला. हा निर्णय मुल्डरने स्वतः घेतला की तो संघाचा निर्णय होता हे सांगणे कठीण आहे, परंतु मुल्डर नवा इतिहास लिहिण्याच्या उंबरठ्यावर पोहोचून स्वतःच मागे फिरला.
विआन मुल्डर परदेशी भूमीवर खेळताना सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. (Wiaan Mulder overseas record) त्याने 67 वर्षांचा जुना रेकाॅर्ड मोडला आहे. 338 धावा करून मुल्डरने हनीफ मोहम्मदचा रेकाॅर्ड मोडीत काढला. पाकिस्तानच्या या माजी फलंदाजाने 1958 मध्ये परदेशी भूमीवर 337 धावांची दमदार खेळी केली होती. कसोटीत परदेशी भूमीवर खेळताना सर्वात मोठ्या डावाचा रेकाॅर्ड आता विआन मुल्डरच्या नावावर नोंदवला गेला आहे. (Test cricket batting records)
यासोबतच मुल्डर एका कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये मिळून दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. ग्रॅमी स्मिथने 2003 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून 385 धावा केल्या होत्या. मात्र, मुल्डरने एकाच डावातील धावसंख्येने स्मिथला मागे टाकले आहे.
Bul बुलावायो मधील घोषणा! 🚨
प्रेरणादायक वियान मुलडर यांच्या नेतृत्वात शानदार फलंदाजीच्या प्रदर्शनाचा अंत झाला. 💪🇿🇦
दुपारच्या जेवणानंतर झिम्बाब्वे लगेचच फलंदाजीचा डाव सुरू करेल. 🏏#ओएन मान्य आहे pic.twitter.com/hxyrndzbso
– प्रोटीस मेन (@प्रोटेस्टमॅन्सा) 7 जुलै 2025
Comments are closed.