IND vs NZ: प्लेइंग इलेव्हनमध्ये अभिषेक शर्मा असेल की नाही? फायनलपूर्वी प्रशिक्षक गंभीरला भारतीय दिग्गजाचा महत्त्वाचा सल्ला

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील विजेता कोण होणार हे आता फक्त 2 दिवसांत समजेल. 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. संपूर्ण स्पर्धेत युवा फलंदाज अभिषेक शर्माचा (Abhishek Sharma) खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्याने 7 डावांत त्याला केवळ 89 धावा करता आल्या आहेत.

​त्याच्या खराब कामगिरीमुळे ‘फायनलमध्ये अभिषेकला डच्चू द्यावा’ अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Deo) यांनी टीम मॅनेजमेंटला वेगळा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, अभिषेकला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले पाहिजे.
च्या
​एका क्रीडा कार्यक्रमादरम्यान कपिल देव म्हणाले की, टीम मॅनेजमेंटने आपल्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास दाखवायला हवा. ते म्हणाले, अभिषेकने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे की ‘हो, मी हे करू शकतो आणि करून दाखवेन. अजूनही सर्वात मोठा सामना शिल्लक आहे, तो म्हणजे फायनल.
​अभिषेक शर्माने या विश्वचषकातील 7 सामन्यांत केवळ 89 धावा केल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेत त्याची एकमेव पन्नाशी (55 धावा) झिम्बाब्वेविरुद्ध आली होती.

विशेष म्हणजे, त्याची स्पर्धेतील सुरुवात सलग तीन वेळा ‘शून्य’ (Zero) वर बाद होऊन झाली होती, त्यानंतर तो सतत दबावाखाली खेळताना दिसत आहे. आता 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येतील. तेव्हा अभिषेकच्या फॉर्मवर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.

Comments are closed.