32 चेंडूत ठोकले शतक… आता वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात होणार एन्ट्री? BCCI देणार सोन्याची संधी?


ODI आणि T20I मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ : रायझिंग आशिया कप 2025 मध्ये इंडिया अ संघाला उपांत्य फेरीत बांग्लादेश अ कडून पराभव स्विकारावा लागला असला, तरी 14 वर्षीय तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या अविश्वसनीय कामगिरीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून वैभवने अवघ्या 4 सामन्यांत 239 धावा ठोकत आपली क्षमता आणि उत्तम फॉर्म सिद्ध केला. संघात अनेक वरिष्ठ खेळाडू असताना, अवघ्या 14 वर्षांच्या मुलाने सर्वांना मागे टाकत धावांच्या यादीत अव्वल राहणे ही काही छोटी कामगिरी नाही.

32 चेंडूंमध्ये शतक, क्रिकेटविश्व थक्क…

यूएई विरुद्धच्या सामन्यात वैभवने अक्षरशः चमत्कार घडवला. त्याने अवघ्या 32 चेंडूंमध्ये शतक ठोकत 143 धावांची तुफानी खेळी साकारली. या धडाकेबाज कामगिरीनंतर तज्ज्ञ आणि चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली, वैभवला लवकरात लवकर टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात संधी मिळणार का? सध्या वैभव सूर्यवंशीला टी20 फॉर्मेटसाठी उत्तम पर्याय मानले जात असले, तरी त्याला वरिष्ठ टी20 संघात कसे बसवायचे, हा मोठा प्रश्न आहे. भारतीय टी20 संघ सध्या जवळजवळ पूर्णपणे स्थिर आहे. प्रत्येक खेळाडूचा रोल निश्चित आहे. अशा वेळी टी20 विश्वचषक 2026 पूर्वी टीम कॉम्बिनेशनमध्ये बदल करणे धोका ठरू शकतो.

तज्ज्ञांचे मत असे की, वैभवला संघात घ्यायचे असल्यास ओपनिंगमध्ये फेरबदल करावा लागेल. सलामीवीर शुभमन गिल काही काळापासून लयीत दिसत नाहीत. हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो ज्यावर निवडकर्त्यांना विचार करावा लागेल.

दक्षिण आफ्रिका मालिकेकडेही सर्वांची नजर

भारत लवकरच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. अनेकजण सुचवत आहेत की, या मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीला स्क्वाडमध्ये घेतले, तर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मिळेल. मात्र सध्या तरी त्याची निवड होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता निवड समिती पुढे कोणती रणनीती आखते, आणि या युवा टीम इंडियाच्या मुख्य संघात कधी संधी मिळते, हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)

  • पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)
  • दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)
  • पहिला एकदिवसीय सामना: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)
  • दुसरा एकदिवसीय सामना: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)
  • तिसरा एकदिवसीय सामना: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)
  • पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम, कटक)
  • दुसरा T20: 11 डिसेंबर (PCA स्टेडियम)
  • तिसरा T20: 14 डिसेंबर (HPCA स्टेडियम)
  • चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)
  • पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)

हे ही वाचा –

Smriti Mandhana Father News : लग्नसोहळ्यापूर्वी स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली, सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.