RCB वर 1 वर्षाची बंदी घालण्याच्या हालचाली, BCCI मोठा झटका देण्याच्या तयारीत
आयपीएलकडून बीसीसीआय बंदी आरसीबीला बंदी घालेल: IPL 2025 मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने इतिहास रचलाय. तब्बल 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीला आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यात यश आलंय. दरम्यान, आयपीएल जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्य (RCB) संघासाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर भव्य विजय मिरवणूक आणि सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या विजय सोहळ्यादरम्यान मोठी गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झालेली पाहायला मिळाली. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले. या घटनेनंतर RCB विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली असून, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे दोन अधिकारी राजीनामा देऊन बाहेर पडले आहेत. याप्रकरणात एका व्यक्तीला अटक देखील झाली आहे. (will bcci ban rcb from ipl)
RCB टीम अडचणीत, BCCI घेणार कडक निर्णय?
चेंगराचेंगरीत झालेल्या लोकांच्या मृत्यूनंतर RCB संघ सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. IPL 2026 मध्ये RCB संघ सहभागी होणार की नाही, यावर BCCI मोठा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (will bcci ban rcb from ipl)
BCCI संघावर बंदी घालणार?
विजय मिरवणुकीदरम्यान इतकी मोठी चूक कशी घडली? याबाबत सध्या चौकशी सुरु आहे. जर या गंभीर चुकांमध्ये RCB व्यवस्थापनाचा थेट सहभाग आढळला, तर BCCI न्यायदायी भूमिका घेत RCB संघावर कारवाई करू शकते. (will bcci ban rcb from ipl)
हेही लक्षात घ्यावे लागेल की, IPLमधील प्रत्येक फ्रँचायझी ही बिझनेस करत असली तरीही, BCCIच्या करारांद्वारे त्यांचे नियम नियंत्रित केले जातात. ज्यामध्ये सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अनेक अटी असतात. या अटींचा भंग झाल्यास मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते. (will bcci ban rcb from ipl)
काय घडलं नेमकं?
RCB ने मंगळवारी (दि.3, 2025) पंजाब किंग्जचा पराभव करून IPL 2025 चा पहिला विजेतेपद मिळवलं. यानंतर आरसीबीचा संघ बुधवारी बंगळुरू शहरात पोहोचला आणि विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. लाखो चाहते आपल्या आवडत्या संघाचे स्वागत करण्यासाठी स्टेडियमबाहेर एकत्र जमले होते. (will bcci ban rcb from ipl)
मात्र, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने अचानक चेंगराचेंगरी झाली आणि गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना केवळ कर्नाटक नव्हे तर संपूर्ण भारतासाठी धक्का देणारी आहे. आता सर्वांचे लक्ष BCCIच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. RCB संघावर बंदी घालण्याचा निर्णय होतो का? हे लवकरच स्पष्ट होईल. (will bcci ban rcb from ipl)
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.