भारताच्या या संघाविरुद्ध खेळणार क्रिस्टियानो रोनाल्डो? इतिहासात पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट
भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Christriyano Ronaldo) आता एफसी गोवाच्या विरोधात मैदानात उतरणार आहे. रिपोर्ट्सनुसार, एएफसी चॅम्पियन्स लीगच्या ग्रुप-डी मधील आगामी सामन्यासाठी रोनाल्डोला अल नासर टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. रोनाल्डो सध्या सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून खेळत आहे. त्यामुळे ही बाब भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने “गुड न्यूज” ठरत आहे.
हा सामना बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे होणार आहे. यापूर्वी भारतीय चाहत्यांना अपेक्षा होती की, रोनाल्डो भारतात, म्हणजे गोव्यात होणाऱ्या रिव्हर्स लेग सामन्यात खेळताना दिसेल, पण ते शक्य झाले नाही.
ही माहिती सौदी अरेबियातील ‘अल-रियादियाह’ या वृत्तसंस्थेकडून समोर आली आहे. त्यांच्या रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डो एफसी गोवाचा सामना करू करू शकतो.
याआधी अल नासरचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज जीसस यांनी संकेत दिले होते की, क्लब रोनाल्डोला अनावश्यक शारीरिक ताणापासून वाचवण्यावर भर देत आहे, विशेषतः देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्पर्धा लक्षात घेता. त्यामुळेच गोवाविरुद्धच्या आधीच्या सामन्यात रोनाल्डो खेळला नव्हता.
सध्या एफसी गोवाचे इंडियन सुपर लीगमधील प्रदर्शन फारसे समाधानकारक नाही. ग्रुप-डी मध्ये गोवा सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांत संघाला 3 पराभव पत्करावे लागले आहेत.
Comments are closed.