रवींद्र जडेजानंतर चेन्नई हा 13 कोटींचा खेळाडूही रिलीज करण्याच्या तयारीत! IPL 2026 आधी मोठा बदल

आयपीएल 2026 (IPL 2026) आधी सर्व संघ मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. 15 नोव्हेंबरला रिटेन्शन लिस्ट जाहीर होणार असून, त्याआधीच CSK ने मोठा निर्णय घेत रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) रिलीज केले आणि राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला (Sanju Samson) ट्रेड करून घेतले. आता CSK आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. जडेजानंतर आणखी एका स्टार खेळाडूला बाहेर करण्याची तयारी टीमने केली आहे.

जडेजानंतर आता 5 वेळा आयपीएल जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्स टीमचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाला (Matheesha pathirana) संघामधून काढण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार चेन्नई लवकरच पथिरानाला रिलीज करू शकते.

आयपीएल 2025 च्या अगोदर चेन्नईने पथिरानाला तब्बल 13 कोटी रुपयांत रिटेन केले होते. पण आता टीम त्याला सोडण्याच्या तयारीत आहे.

22 वर्षीय पथिरानाने आयपीएल 2025 मध्ये 12 सामन्यांत 13 बळी घेतले. 2024 मध्ये 6 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या. 2023 मध्ये त्याने चेन्नईसाठी उत्कृष्ट गोलंदाजी करत 12 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या. तो योग्य लाइन-लेंथ आणि विशेषतः यॉर्कर गोलंदाजीसाठी ओळखला जातो. डेथ ओव्हर्समध्ये किफायतशीर बॉलिंग करण्याची क्षमता त्याच्यात आहे.

आशिया कप 2025 मध्ये बांग्लादेशविरुद्ध त्याने एक सामना खेळला, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही झिम्बाब्वेविरुद्ध त्याने 1 विकेट घेतली. आत्तापर्यंत त्याने 15 ODI मध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. 21 टी20 सामन्यांत 31 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने 4 हंगाम खेळले असून एकूण 47 विकेट्स घेतल्या आहेत.

Comments are closed.