पॅट कमिन्स-ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियन संघामधून बाहेर पडणार? IPL फ्रेंचायझीने दिली तब्बल 58 कोटींची ऑफर!
निकोलस पूरन (Nicolas Pooran & Henrich Classen) आणि हेन्रिक क्लासेन यांनी खूपच कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम-राम केला होता. त्यांच्या या निर्णयामागचं खरं कारण फार कमी लोकांना समजलं होतं. आता द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या रिपोर्टमुळे क्रिकेटविश्वात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या बातमीमुळे सर्व आंतरराष्ट्रीय संघांवर ताण वाढला आहे. रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स (Pat Cummins & Travis Head) आणि ट्रॅव्हिस हेड यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्यासाठी तब्बल 58 कोटींची ऑफर मिळाली आहे.
द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या रिपोर्ट्सनुसार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि स्टार ओपनर ट्रॅव्हिस हेड यांना एका आयपीएल फ्रेंचायझीकडून वर्षाला 58 कोटींची ऑफर मिळाली होती. या ऑफरनुसार त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून वर्षभर फक्त फ्रेंचायझी क्रिकेट खेळायचं होतं. मात्र, या दोन्ही खेळाडूंनी ही ऑफर नाकारत ऑस्ट्रेलियासाठीच खेळण्याचा निर्णय घेतला. याआधी 2023 साली जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) देखील मुंबई इंडियन्सने अशीच ऑफर दिली होती. सध्या आयपीएलमध्ये पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसत आहेत.
Comments are closed.