कोचचे धक्कादायक विधान, IPL 2026 मध्ये थाला दिसणार का?

जसा जसा आयपीएल 2025 हंगाम संपत आहे, त्याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. 2025 त्याचा शेवटचा हंगाम आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात पाच ट्रॉफी जिंकलेल्या आहेत आणि त्याने संघाला एक नवीन ओळख दिली आहे. पण या हंगामात चेन्नईने म्हणावे तसे प्रदर्शन केले नाही. तरीही महेंद्रसिंग धोनीचं मैदानावर असणं चाहत्यांसाठी कोणत्याही प्रेरणेपेक्षा कमी नाही. तत्पूर्वी त्याच्या लहानपणीचे कोच केशव रंजन बॅनर्जी यांनी त्याच्या भविष्याबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

टाइम्स नाउशी बातचीत करताना बॅनर्जी म्हणाले, महेंद्रसिंग धोनी सध्या पुढच्या हंगामासाठी युवा चेन्नई संघ तयार करत आहे आणि यामुळे संभावना आहे की, तो आयपीएल 2026 मध्ये खेळू शकतो. ते म्हणाले, केवळ धोनीलाच माहिती आहे की हा हंगाम त्याचा शेवटचा हंगाम आहे का. आम्हाला सर्वांना वाटते की, तो जोपर्यंत खेळू शकतो तोपर्यंत त्याने खेळावे. जर चेन्नईला वाटत असते, तर त्यांनी आयपीएल 2025 च्या आधीच त्याच्याशी संबंध तोडले असते. त्याने तो मेगा लीलावामध्ये तो सामील होऊ शकला असता, पण तसे झाले नाही. चेन्नईला धोनी त्यांच्या संघामध्ये हवा आहे. कारण तो संघाला एक नवीन दिशा देऊ शकतो. त्यामुळेच पुढच्या हंगामात आपण त्याला खेळताना पुन्हा बघू शकतो.

याआधी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी धोनी विषयी म्हटले होते की, धोनी चेन्नईचे हित लक्षात घेऊन खेळत आहे. कोणताही खेळाडू स्वतःसाठी नाही तर संघासाठी काय चांगले आहे, हे लक्षात घेऊन निर्णय घेतो. त्याचप्रमाणे धोनीने या हंगामात खेळताना जे निर्णय घेतले असतील ते पूर्णरित्या चेन्नईसाठी काय योग्य आहे? हे विचार करूनच घेतले असतील.

Comments are closed.