आशिया कपपूर्वी एम.एस. धोनीला BCCI कडून ऑफर? जाणून घ्या टीम इंडियात कशा प्रकारे होणार सहभागी

टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्याआधीच एक मोठी माहिती समोर आली आहे आणि ती भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजवणारी ठरू शकते. एका रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय (BCCI) पुन्हा एकदा एम.एस. धोनीला मेंटरची जबाबदारी देण्याच्या विचारात आहे. याआधी 2021 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये धोनी टीम इंडियाचा मेंटर होता, तेव्हा रवी शास्त्री हे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) होते. रिपोर्टनुसार बीसीसीआयने धोनीला ऑफर दिली आहे, पण कदाचित धोनी ती मान्य करणार नाही.

क्रिकब्लॉगरच्या रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, धोनी मेंटर म्हणून टीम इंडियाच्या पुढच्या पिढीची तयारी करण्यास खूप उपयोगी ठरू शकतो. पण असेही म्हटले जात आहे की, धोनी ही ऑफर नाकारू शकतो आणि त्यामागे कारण असेल गौतम गंभीर (Gautam Gambhir). 2021 मध्ये जेव्हा धोनी मेंटर झाला होता, तेव्हा भारत उपांत्य फेरीतही पोहोचला नव्हता.

काही इतर रिपोर्ट्सनुसार, धोनी आयपीएल 2026 नंतर IPL मधून देखील निवृत्ती घेऊ शकतो, कारण टी20 वर्ल्ड कप 2026 संपल्यानंतर लगेचच पुढच्या महिन्यात आयपीएल 2026 सुरू होणार आहे.

धोनी टीमसोबत राहिल्यास तरुण पिढीसाठी ते खूप फायदेशीर ठरेल यात शंका नाही. मात्र त्याची विचार करण्याची पद्धत आणि गौतम गंभीरची पद्धत यामध्ये मोठा फरक असल्याचेही म्हटले जाते.

पहिला टी20 वर्ल्ड कप 2007 मध्ये खेळला गेला होता. त्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 धावांनी मात करून ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 मध्ये धोनीच्या कर्णधारपदाखाली भारत पुन्हा फायनलमध्ये पोहोचला, पण त्या वेळी भारताला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.

Comments are closed.