कधीही पाहिली नसेल अशी लष्करी कारवाई करू, सूडासाठी आसुसलेल्या इराणला डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराण चांगलाच बिथरला असून इस्रायल आणि अमेरिकेचा सूड घेण्याच्या तयारीत आहेत. इस्रायल-अमेरिकेला धडा शिकवण्याची भाषा इराण करत आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली असून कधीही पाहिली नसेल अशी लष्करी कारवाई करू असा इशारा त्यांनी इराणला दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केली आहे, “इराणने नुकतेच सांगितले की ते आज खूप कठोरपणे मारणार आहेत, यापूर्वी कधीही मारले गेले नव्हते त्यापेक्षा जास्त. त्यांनी तसे न करणे चांगले आहे, त्यांनी असे केल्यामुळे, आम्ही त्यांना अशा शक्तीने मारू जे याआधी कधीही न पाहिलेले असेल…” pic.twitter.com/DvKDuW49ft
— ANI (@ANI) 1 मार्च 2026
Comments are closed.