पहिल्या वनडेआधी वाईट बातमी; धर्मशालेत काळे ढग, भारत-अफगाणिस्तान होणार रद्द?, जाणून घ्या अपडेट्स

भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिला एकदिवसीय हवामान अहवाल : भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आयपीएल 2026 नंतर टीम इंडिया प्रथमच वनडे क्रिकेटमध्ये मैदानात उतरत असल्याने या मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे. मात्र सामन्यापूर्वीच पावसाने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.

12 जून रोजी शहरात जोरदार पाऊस

धर्मशालामध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामान अस्थिर आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 12 जून रोजी शहरात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे खेळपट्टी आणि मैदानाच्या परिस्थितीबाबतही चर्चा रंगल्या आहेत. हवामान खात्याने हिमाचल प्रदेशातील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तसेच 16 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

AccuWeather नुसार, दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान पाऊस पडण्याची 50 ते 70 टक्के शक्यता आहे. सायंकाळी 6 नंतर पावसाचा अंदाज कमी होण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार, सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होणार असून, नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल.

सकाळ ते रात्रीपर्यंत प्रत्येक तासाला पावसाचा अंदाज काय आहे?

सकाळी 7 वाजता : 40 टक्के
सकाळी 8 वाजता : 34 टक्के
सकाळी 9 वाजता : 37 टक्के
सकाळी 10 वाजता : 47 टक्के
सकाळी 11 वाजता : 51 टक्के
दुपारी 12 वाजता : 47 टक्के
दुपारी 1 वाजता : 49 टक्के
दुपारी 2 वाजता : 70 टक्के
दुपारी 3 वाजता : 67 टक्के
दुपारी 4 वाजता : 40 टक्के
दुपारी 5 वाजता : 34 टक्के
संध्याकाळी 6 वाजता : 22 टक्के
संध्याकाळी 7 वाजता : 0 टक्के

विराट कोहली दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर

दरम्यान, टीम इंडियासाठी मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघाला त्याच्याविना मैदानात उतरावे लागणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघ नव्या जोमाने मालिकेला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे.

भारताची अलीकडील वनडे कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारतीय संघाने एकूण 9 वनडे सामने खेळले असून त्यापैकी 5 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. फक्त 4 सामन्यांत विजय मिळवण्यात संघाला यश आले आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिका देखील भारताने गमावल्या आहेत. त्यामुळे अफगानिस्तानविरुद्धची ही मालिका संघासाठी आत्मविश्वास परत मिळवण्याची मोठी संधी मानली जात आहे.

रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांसारखे अनुभवी तसेच युवा खेळाडू संघात आहेत. त्यामुळे पावसाने अडथळा आणला नाही तर चाहत्यांना रोमांचक क्रिकेट पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. आता सर्वांच्या नजरा धर्मशालाच्या आकाशाकडे लागल्या असून पाऊस किती हस्तक्षेप करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हे ही वाचा –

Shreyas Iyer News : कर्णधार होताच श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत घेतला आलिशान फ्लॅट; भाडं ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Comments are closed.