आशिया कप ट्रॉफीसाठी भिडणार भारत-पाकिस्तान?, फायनलचं नाट्यमय समीकरण, समजून घ्या Point Table चं ग

IND vs PAK U19 आशिया कप 2025 : टीम इंडियाने 28 सप्टेंबर 2025 रोजी UAEमध्ये पाकिस्तानला नमवत आशिया कप ट्रॉफी जिंकली होती. आता अवघ्या 81 दिवसांनंतर त्याच भूमीवर भारतासमोर पुन्हा एकदा आशिया कप जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे, यावेळी मात्र अंडर-19 क्रिकेटमध्ये ती संधी आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-19 संघ आशिया कप 2025 चे विजेतेपद पटकावू शकतो आणि विशेष म्हणजे, अंतिम लढत पुन्हा पाकिस्तानविरुद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

U19 आशिया कप 2025: उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट, 4 संघटनांची पुष्टी!

अंडर-19 आशिया कप 2025 च्या सेमीफायनलचं चित्र स्पष्ट झाले आहे. पहिला सेमीफायनल भारत विरुद्ध श्रीलंका आणि दुसरा सामना डिफेंडिंग चॅम्पियन बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान होणार आहे. हे दोन्ही सेमीफायनल सामने 19 डिसेंबर रोजी खेळवले जाणार आहेत.

भारत-पाकिस्तान अंतिम फेरीत कसे भिडू शकतात?

जर ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर राहिलेला भारताने श्रीलंकेला पराभूत केले आणि दुसरीकडे पाकिस्तानने बांगलादेशला लोळवलं, तर येणाऱ्या रविवारी (21 डिसेंबर) हायहोल्टेज असेल. कारण त्याच दिवशी अंडर-19 आशिया कप 2025 चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी सेमीफायनल जिंकले, तर अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान महामुकाबला निश्चित होईल.

U19 Asia Cup 2025 मध्ये आतापर्यंत किती वेळा भिडले भारत-पाक?

जर अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले, तर हा सामना एका आठवड्यातील दुसरा सामना ठरेल. यापूर्वी 14 डिसेंबरला ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघांमध्ये लढत झाली होती, ज्यात भारताने पाकिस्तानवर 90 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.

ग्रुप स्टेजमधील भारताचा दबदबा

त्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली आणि 46.1 षटकात 240 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून आरोन जॉर्जने सर्वाधिक 85 धावा केल्या, तर कनिष्क चौहानने 46 धावांची शानदार खेळी केली होती. प्रत्युत्तर, 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानने 150 धावांवर बाद होऊन सामना गमावला. भारताकडून कनिष्क चौहान आणि दीपेश देवेंद्रन यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. किशन सिंगने 2 बळी घेतले, तर वैभव सूर्यवंशीनेही 1 बळी घेतला.

अंतिम फेरीत इतिहास पुन्हा घडणार?

आता साऱ्या नजरा सेमीफायनलवर आहेत. भारत आणि पाकिस्तान दोघेही जिंकले, तर UAEच्या त्याच मैदानावर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आशिया कप फायनलचा इतिहास घडताना दिसेल. क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना म्हणजे थरार, भावनांचा उद्रेक आणि रोमांचाची हमखास मेजवानी ठरणार आहे.

अंडर 19 आशिया कप 2026 उपांत्य फेरीचे थेट प्रक्षेपण

भारत विरुद्ध श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया कप 2026 उपांत्य फेरीचे थेट प्रक्षेपण विविध स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल, तर भारतीय चाहते जिओहॉटस्टारवर अंडर 19 आशिया कप उपांत्य फेरीचे थेट प्रक्षेपण पाहू शकतील.

हे ही वाचा –

IPL ऑक्शनमध्ये कोणत्याच संघमालकाने ढुंकूनही पाहिलं नाही, अनसोल्ड राहिला, पण त्याच खेळाडूकडे आता कर्णधारपद, KL राहुलचीही निवड

आणखी वाचा

Comments are closed.