आशिया कप 2025 मिस करणार जसप्रीत बुमराह? या मालिकेतून करू शकतो पुनरागमन मैदानावर!

एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025च्या शेवटच्या सामन्यात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळत नाहीये. फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे बुमराह सतत तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसत नाही. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाला आशिया कप 2025मध्ये सहभागी व्हायचं आहे. रिपोर्ट्सनुसार बुमराहचे या स्पर्धेत खेळणे कठीण आहे. जसप्रीत लांब ब्रेकनंतर या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.

पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार जसप्रीत बुमराह आशिया कप 2025मधून बाहेर राहू शकतो. बुमराहने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यानंतर या फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. फिटनेसच्या कारणामुळे बुमराह फार कमी सामने खेळताना दिसतो. भारतीय टीम मॅनेजमेंट बुमराहचा वापर फक्त मोठ्या टूर्नामेंट्स आणि महत्त्वाच्या सीरिजसाठीच करू इच्छित आहे. बुमराह जर आशिया कपमध्ये खेळला नाही, तर युवा जलदगती गोलंदाजांना संधी मिळू शकते. जलदगती गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर सध्या अर्शदीप सिंगचे स्थान टी20 संघात निश्चित आहे. त्याच्याशिवाय इतर गोलंदाज सतत संघात ये-जा करत आहेत.

टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळणार आहे. रिपोर्ट्सनुसार याच मालिकेतून बुमराह पुन्हा मैदानात परतेल. त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही टीमचा भाग असेल. टी20 विश्वचषक 2026 पूर्वी बुमराह एक टी20 मालिका खेळेल, आणि त्यानंतर आयसीसीच्या या स्पर्धेत तो सहभागी होईल. फॉर्मबद्दल बोलायचे झाले, तर सध्या बुमराह जबरदस्त फॉर्म मध्ये आहे.

Comments are closed.