संजू सॅमसन ठरणार का चेन्नई संघाची मोठी चूक? जडेजा सोबतच हा मॅच विनर खेळाडूही जाणार संघाबाहेर?

संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील ट्रेडच्या बातम्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान होणाऱ्या या ट्रेड डीलमध्ये प्रत्येक तासाला काहीतरी मोठे बदल दिसत आहेत. संजू सॅमसन मिळवण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाने 2 खेळाडूंची मागणी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, चेन्नई सुपर किंग्स संघ जडेजासोबत आणखी एका स्टार ऑलराउंडर खेळाडूला देण्यासाठी तयार झाला आहे.

ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, संजू सॅमसन मिळवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ रवींद्र जडेजा आणि सॅम करन दोघांनाही राजस्थान रॉयल्ससोबत ट्रेड करण्यासाठी तयार आहे. आधी राजस्थान संघाने रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांची मागणी केली होती, पण चेन्नईने नकार दिला. त्यानंतर जडेजासोबत डेवाल्ड ब्रेविसची मागणी राजस्थानकडून सुरू झाली. सीएसके व्यवस्थापनाने नकार दिल्यानंतर राजस्थानने जडेजासोबत पथिरानाचीही मागणी केली होती. बातम्यांनुसार, सध्या जडेजा आणि सॅम करनच्या बाबतीत सहमती झाली आहे.

Comments are closed.