मलेशियामध्ये मोदी-डोनाल्ड ट्रम्प भेटणार?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मलेशियामध्ये येत्या रविवारी म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी आसियान शिखर परिषद सुरू होणार आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मलेशियाच्या नेतृत्वाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आसियान शिखर परिषदेत सहभागाची पुष्टी आधीच केली आहे. तथापि, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने अद्याप या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान शिखर परिषदेत सहभागी होतील की नाही याची भारत सरकारने अद्याप अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. तरीही सध्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.
Comments are closed.