मोहम्मद शमीचं टीम इंडियात आता पुनरागमन होणार नाही का? जाणून घ्या आकाश चोपडा शमीबद्दल नेमकं काय म्हणाले

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही मोहम्मद शमी निवडकर्त्यांच्या विश्वासाला पात्र ठरला नाही. कसोटी मालिकेनंतर वनडे आणि टी-20 टीममध्येही शमीला संधी मिळाली नाही. यामुळे आता भारतीय वेगवान गोलंदाजाच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

शमी आता टीम इंडियात परत येऊ शकेल की नाही, याचे उत्तर भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा यांनी दिले आहे. शमीने टीम इंडियाची जर्सी घालून शेवटी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळली होती.

आकाश चोपडा (Aakash chopra) यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर शमीच्या भविष्याबाबत बोलताना मोठं विधान केलं. त्यांनी सांगितले,
मला शमीसाठी चांगली भावना येत नाही, कारण जर त्याचे नाव अद्याप आलेले नाही, तर टीम इंडियात परत येण्याची संधी फारच कमी दिसते. शमीने नक्कीच घरगुती क्रिकेट खेळायला पाहिजे आणि तो खेळत आहे. मात्र, शमी सध्या रेसमध्ये मागे आहे.

तरीही, आपल्याकडे फार जास्त वेगवान गोलंदाजांचे पर्याय नाहीत, त्यामुळे आपण असे म्हणू शकत नाही की, जर कुणाचे नाव सध्या टीममध्ये नाही, तर त्याला परत येण्याची संधी नाही. शमीचे नाव परत टीममध्ये येऊ शकते, पण संधी खूपच कमी आहे. त्याला परत येण्यासाठी आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्यक आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये मोहम्मद शमीची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. त्याने टीम इंडियाला विजेता बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि 5 सामन्यात 9 विकेट्स मिळवल्या. मात्र, फायनल सामन्यात शमी महाग पडला त्याने 9 षटकात 74 धावा दिल्या.

यानंतर आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी शमीची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. त्यानंतर शमी काही काळ आपल्या जखमेमुळे त्रस्त राहिला. असे समजले जात होते की, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शमी शेवटच्या काही सामन्यांमध्ये खेळेल, पण तसे झाले नाही. इंग्लंड दौऱ्यावरही शमीला दुर्लक्षित केले गेले.

Comments are closed.