बांगलादेश हा देश शत्रू नाही..’, मुस्तफिजुर रहमानच्या आयपीएल खेळण्यावर बीसीसीआयचं मोठं विधान
आगामी आयपीएल (IPL 2026) हंगामात बांगलादेशी खेळाडूंच्या सहभागावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) 9.20 कोटी रुपयांना खरेदी केलेला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान (Mustfijur Rehman) खेळणार की नाही, याबाबत बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिले आहे.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, सध्याची राजकीय परिस्थिती संवेदनशील आहे आणि आम्ही सतत सरकारच्या संपर्कात आहोत. मात्र, बांगलादेशी खेळाडूंवर बंदी घालण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. बांगलादेश हा काही शत्रू देश नाही, त्यामुळे मुस्तफिजुर रहमान नक्कीच आयपीएल खेळेल.
भारत आणि बांगलादेशमधील संबंध सध्या तणावाचे आहेत. बांगलादेशातील अल्पसंख्याकांविरुद्ध होत असलेल्या हिंसेमुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट आहे. बांगलादेशी खेळाडू ज्या सामन्यात खेळतील, ते सामने उधळून लावण्याच्या धमक्या काही लोकांनी दिल्या आहेत.
मुस्तफिजुर रहमानला 9. 20 कोटींना विकत घेतल्यामुळे सोशल मीडियावर कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) जोरदार टीका झाली. काही नेटकऱ्यांनी तर केकेआरला अँटी-नॅशनल’ (देशविरोधी) असेही संबोधले आहे.
Comments are closed.