T20world Cup: आजच ठरणार पाकिस्तानचं भवितव्य; सेमीफायनलचं ‘हे’ नवं समीकरण चक्रावून टाकणारं!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज (27 फेब्रुवारी) इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs Newzealand) यांच्यात सुपर-8 चा महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. या एका सामन्यावर पाकिस्तानचे सेमीफायनलचे भवितव्य अवलंबून आहे.
जर न्यूझीलंडने इंग्लंडला हरवले, तर त्यांचे 5 गुण होतील आणि ते थेट सेमीफायनलमध्ये पोहोचतील. अशा परिस्थितीत पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होईल, कारण पाकिस्तानला त्यांचा शेवटचा सामना जिंकूनही जास्तीत जास्त 3 गुणांपर्यंतच पोहोचता येईल. तसेच इंग्लंडचा संघ आधीच सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. यजमान श्रीलंका संघ देखील आधीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
सुपर-8 मध्ये पाकिस्तानला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे केवळ 1 गुण मिळाला. इंग्लंडविरुद्ध सलमान आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव झाला.
Comments are closed.