विराट कोहलीची निवृत्तीबाबत मोठी घोषणा – जाणून घ्या काय म्हणाला?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आत्ताच चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचा किताब जिंकला. भारतीय संघाने तिसऱ्या वेळेस चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची भूमिका महत्त्वाची ठरली. विराटने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतकी पारी खेळली. तसेच उपांत्यफेरी सामन्यात सुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 84 धावांची महत्वपूर्ण अशी पारी खेळली.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी विराट कोहलीच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. कारण तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये काही खास प्रदर्शन करू शकला नाही. त्यानंतर विराटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन केले आणि टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच त्याने हेही स्पष्ट केले आहे की, तो सध्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत नाही. तो खेळाचा मनसोक्त आनंद घेत आहे आणि त्याच्या मनात प्रतिस्पर्ध्या संघाशी स्पर्धा करण्याची अजून भावना आहे. कर्णधार रोहित शर्माने सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर विराटच्या निवृत्तीच्या चर्चांवर उत्तर दिले आहे.
विराट कोहलीने स्वीकार केले की, एकदा त्याने राहुल द्रविड यांच्यासोबत त्याच्या निवृत्तीच्या योग्य वेळे बद्दल चर्चा केली होती. तेव्हा राहुल यांनी विराटला फक्त हा सल्ला दिला की, विराट आता त्याचा जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर आहे, याचा त्याने विचार करावा. त्यानंतर कोहलीने संकेत दिला की, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024- 25 त्याचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा होता आणि तो 4 वर्षानंतर कदाचित ऑस्ट्रेलिया दौरा करू शकतो.
विराट कोहली आरसीबी इनोवेशन लॅब इंडियन स्पोर्ट समिट यादरम्यान तो म्हणाला, माझ्यासाठी ऑस्ट्रेलिया दौरा खूप निराशाजनक होता. कदाचित 4 वर्षानंतर मी हा दौरा करणार नाही. आता माझ्याकडे त्याला ठीक करण्याची संधी नाही. त्यामुळे तुमच्या जीवनात जे काही होईल ते तुम्हाला स्वीकार करावेच लागेल.
विराट म्हणाला, जेव्हा तुम्ही बाहेरून निराशेचा विचार करता, तेव्हा तुमच्या मनावर खूप दबाव आणि ओझं होतं. जे मी ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान अनुभवलं. कारण कसोटीमध्ये मी चांगला स्कोर केला होता. त्यामुळे मी विचार केला की, मी या दौऱ्यातही चांगला खेळेल पण तसं झालं नाही.
पुढे त्याने सांगितले, घाबरू नका. मी कोणतीही निवृत्तीची घोषणा करत नाही. आत्तापर्यंत सगळं काही ठीक आहे. मला आत्ता खेळण्याची इच्छा आहे आणि मला खेळल्यानंतर खूप आनंद भेटतो. तसेच माझं खेळावर अत्यंत प्रेम आहे. जोपर्यंत प्रतिस्पर्धी भावना माझ्या मनात आहे, तोपर्यंत मी क्रिकेट खेळणं चालू ठेवेल. मी कोणत्याही कामगिरीसाठी खेळणार नाही. मी संघासाठी आणि संघाच्या विजयासाठीच खेळणार आहे.
Comments are closed.