India vs Pakistan: भारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट! 15 फेब्रुवारीबाबत श्रीलंका हवामान खात्याचा मोठा इशारा

टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील सर्वात मोठा सामना 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दरम्यान कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंतचे दोन्ही सामने एकतर्फी जिंकले आहेत, तर पाकिस्तानने नेदरलँड्स आणि यूएसएवर विजय मिळवून आपले आव्हान टिकवून ठेवले आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो थेट सुपर-8 साठी पात्र ठरेल. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे.

श्रीलंकेच्या हवामान विभागाने 15 फेब्रुवारीसाठी एक विशेष बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. नॅचरल हॅझर्ड्स अर्ली वॉर्निंग सेंटरने 13 फेब्रुवारी रोजी सकाळी नोटीस जारी करून नागरिकांना आणि प्रशासनाला हवामानातील बदलांकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

एक्यूवेदर (AccuWeather) रिपोर्टनुसार, 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये 93 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, जी खेळाडू आणि चाहत्यांसाठी अजिबात चांगली बातमी नाही. भारत-पाकिस्तान सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. सायंकाळी पावसाची शक्यता 49 टक्के आहे. यामुळे नाणेफेकीला (Toss) उशीर होऊ शकतो. सामन्याच्या वेळी दिलासादायक बातमी म्हणजे रात्री 7 वाजल्यानंतर पावसाची शक्यता केवळ 9 टक्के राहील. सामन्यादरम्यान कोलंबोचे तापमान 26 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
आकाशात ढगांची गर्दी असेल, पण 7 नंतर पाऊस थांबण्याची शक्यता असल्याने पूर्ण सामना पाहण्याची आशा अजूनही जिवंत आहे.

Comments are closed.