RCB च्या विजयाचा फॉर्म्युला? हे ३ खेळाडू बनू शकतात मास्टरस्ट्रोक

आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्च पासून सुरू होत आहे. तसेच स्पर्धेतील पहिला सामना कोलकत्ताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. तसेच हा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन्ही संघात होणार आहे. आरसीबी या हंगामात नवीन कर्णधारासोबत मैदानात उतरेल. संघाने रजत पाटीदारकडे संघाची धुरा सोपवली आहे. रजतने अनेकदा कमालीची फलंदाजी केली आहे. तसेच आता तो संघाला ट्रॉफी ही मिळवून देऊ शकतो. जर आरसीबीच संपूर्ण वेळापत्रक पाहिलं तर संघाचा शेवटचा सामना केकेआर सोबतच होणार आहे.

आरसीबी संघ आत्तापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकला नाही. पण यावेळेस ते ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. रजत कोहली आणि लिविंगस्टोन हे तीन खेळाडू प्रभावी कामगिरी करू शकतात. महत्त्वाची गोष्ट ही की, विराट कोहली त्याच्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आत्ताच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती.

तसेच मागच्या हंगामातही कोहलीने शानदार प्रदर्शन केलं होतं. त्याने आयपीएल 2024 च्या हंगामात 15 सामन्यात 741 धावा केल्या होत्या. त्यादरम्यान 1 शतक आणि 5 अर्धशतक ठोकले होते. त्यामधील त्याचा सर्वोत्तम स्कोर 113 धावा आहेत. पाटीदार बद्दल बोलायचे झाल्यास त्याने मागच्या हंगामात 15 सामन्यात 395 धावा केल्या होत्या.

आरसीबी संघाचं आयपीएल 2025 स्पर्धेतील संपूर्ण वेळापत्रक

आरसीबी विरुद्ध कोलकाता (22 मार्च कोलकाता)

आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (28 मार्च चेन्नई)

आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स (2 एप्रिल बंगळुरू)

आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स (7 एप्रिल मुंबई)

आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (10 एप्रिल बंगळुरू)

आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स (13 एप्रिल जयपूर)

आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स (18 एप्रिल बंगळुरू)

आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स (20 एप्रिल चंदिगढ)

आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स (24 एप्रिल दिल्ली)

आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (27 एप्रिल दिल्ली)

आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (3मे बंगळुरू)

लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध आरसीबी (लखनऊ मध्ये 9)

आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (13 मे बंगळुरू)

आरसीबी विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स (17 मे बंगळुरू)

Comments are closed.