शाहिद अफरीदीचा विक्रम मोडणार रोहित शर्मा? सिडनीमध्ये रचणार इतिहास
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवत 2-0 ने मालिका आपल्या नावावर केली आहे. तिसरा सामना 25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर असतील. हिटमॅन सिडनी वनडे संस्मरणीय बनवू शकतो. त्याच्या निशाण्यावर पाकिस्तानचा खेळाडू शाहीद अफरीदीचा विक्रम असेल. रोहित हा विक्रम मोडून मोठा पराक्रम साध्य करू शकतो.
रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होण्यापासून काहीच पावले दूर आहे. जर त्याने सिडनी सामन्यात 6 षटकार मारले, तर तो वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल. सध्या हा विक्रम पाकिस्तानच्या शाहीद अफरीदीच्या नावावर आहे, ज्याने 369 डावांमध्ये 351 षटकार लगावले आहेत. तर रोहित शर्माने 267 डावांमध्ये 346 षटकार ठोकले असून, तो सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. जर रोहितने सिडनी वनडेमध्ये 4 षटकार मारले, तर तो 350 षटकारांचा टप्पा पार करणारा दुसरा खेळाडू बनेल.
तिसऱ्या क्रमांकावर क्रिस गेल आहेत, ज्यांनी 294 वनडे डावांमध्ये 331 षटकार ठोकले आहेत. याशिवाय, सनथ जयसूर्या 445 डावांमध्ये 270 षटकार मारले आहेत. तर एमएस धोनी 297 डावांमध्ये 229 षटकार ठोकले आहेत.
Comments are closed.