ODI कर्णधारपद गमावल्यानंतर रोहित शर्माच्या पगारात बदल होणार? जाणून घ्या नियम काय सांगतात

रोहित शर्माला (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या वनडे टीममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, रोहितच्या हातून एकदिवसीय संघाचे कर्णधार पद काढून घेण्यात आले आहे. त्याची जागा शुबमन गिल (Shubman gill) यांना नवीन कर्णधार म्हणून दिली गेली आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांच्या मनात हा प्रश्न उभा राहिला आहे की, कर्णधार पद गेले म्हणून “हिटमॅन”च्या पगारात बदल होईल का? नियम काय सांगतात, ते आता जाणून घ्या.

खरं तर रोहित शर्मा बीसीसीआयच्या (BCCI ) वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. त्याला ए प्लस ग्रेडमध्ये ठेवले गेले आहे. ए प्लस ग्रेडमधील खेळाडूंना दरवर्षी 7 कोटी रुपये मिळतात. कर्णधार पद गेल्यानंतरही रोहितच्या पगारात कोणताही बदल होणार नाही. हिटमॅनला पुढील सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर होईपर्यंत तोच पगार मिळत राहील, जो त्याला कर्णधार असताना मिळत होता.

तरीही, रोहितला कर्णधार पदावरून हटवण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. याच वर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

Comments are closed.