मेस्सी पाठोपाठ आता रोनाल्डोही येणार भारतात? फुटबॉलचा महामुकाबला रंगणार का? जाणून घ्या सविस्तर

क्रिस्टियानो रोनाल्डो: गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या भारत भेटीच्या बातम्या चर्चेत होत्या. आता मेसीच्या इंडिया टूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासोबतच्या भेटीची तारीखही जाहीर झाली आहे. याच दरम्यान, आता क्रिस्टियानो रोनाल्डोही भारतात खेळण्यासाठी येऊ शकतो, असे अपडेट समोर आले आहे. (Cristiano Ronaldo India tour)

वास्तविक, एएफसी चॅम्पियन्स लीग टू 2025-26च्या ड्रॉमध्ये एफसी गोवा आणि रोनाल्डोचा संघ अल-नासर यांना ग्रुप डी मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, या लीगमध्ये दुसरा भारतीय संघ मोहन बागान सुपर जायंट्सला ग्रुप सी मध्ये स्थान मिळाले आहे. (Ronaldo Al Nassr FC Goa)

एएफसी चॅम्पियन्स लीग टूचे सामने 16 सप्टेंबरपासून सुरू होतील आणि ग्रुप स्टेजचा समारोप 24 डिसेंबरला होईल. तर, 16व्या फेरीचे सामने पुढील वर्षी 10 ते 19 फेब्रुवारी दरम्यान आणि उपांत्यपूर्व फेरीचे सामने 3 ते 12 मार्चपर्यंत खेळले जातील. उपांत्य फेरीचे सामने 7 ते 15 एप्रिल दरम्यान होतील आणि अंतिम सामना 16 मे रोजी खेळला जाईल. असा अंदाज लावला जात आहे की क्रिस्टियानो रोनाल्डो व्यतिरिक्त, जोआओ फेलिक्स आणि मार्सेलो ब्रोझोविक देखील सामना खेळण्यासाठी भारतात येऊ शकतात.

रिपोर्ट्सनुसार, अल-नासरसोबतच्या क्रिस्टियानो रोनाल्डोच्या करारामध्ये एक अट आहे की, रोनाल्डोला पाहिजे असल्यास तो संघाच्या बाहेरील मैदानावर होणाऱ्या सामन्यांतून बाहेर बसू शकतो. ग्रुप डी मध्ये अल-नासर आणि एफसी गोवा दोनदा आमनेसामने येणार आहेत. त्यांचा एक सामना रियाधमध्ये आणि दुसरा भारतात होईल. त्यामुळे रोनाल्डोने जर ‘अवे मॅच’ सोडली नाही, तर त्याला खेळण्यासाठी भारतात यावे लागेल. (Ronaldo India away match)

Comments are closed.