सलमान खान आगामी चित्रपटात दिसणार डबल रोलमध्ये?
बाॅलिवुडचा भाईजान सलमान खान सध्या मातृभूमी या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. परंतु या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अजूनही निश्चित झालेली नाही. असे असले तरीही सलमान हा येत्या काही दिवसांमध्ये वामशी पेडिपल्ली यांच्या चित्रपटात दिसणार असल्याचे समजत आहे. मुख्य म्हणजे सलमान या चित्रपटात डबल रोलमध्ये असल्याचे समजते. परंतु याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याआधी सलमानला आपण जुडवा या चित्रपटाच्या माध्यमातून डबल रोलमध्ये पाहिले होते.
तेलगु सिनेमासृष्टीतील वामशी पैडिपल्ली एक नावाजलेले नाव असून, सलमानने मातृभूमी नंतर यांच्यासोबत चित्रपट करण्याचे योजिले आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे.
गेल्या दोन वर्षांवर नजर टाकल्यास, सलमानला एकही हिट चित्रपट देता आला नाही. त्यामुळे त्याचा आगामी मातृभूमी हा चित्रपट हिट होणे खूप गरजेचे आहे. 2025 ला त्याचा शेवटचा सिंकदर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु तो चित्रपट अक्षरशः आपटला होता. त्यामुळेच आता सलमानला आगामी फिल्मकडूनही बऱ्याच अपेक्षा आहेत. वामशी पेडिपल्ली यांच्या आगामी चित्रपटामध्ये सलमान डबल रोल करणार अशी माहिती आता सोशल मीडियावर पसरलेली आहे. परंतु याबाबत निर्मात्यांनी मात्र काहीही जाहीर केले नसल्याने, संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानच्या आगामी चित्रपटासाठी स्टंट सीन डिझाइनची सुरुवात झालेली आहे. याबाबतचे वृत्त हे तेलगुमधील माध्यमांमध्ये छापून आलेले आहे. परंतु निर्मात्यांनी मात्र यासंदर्भात कोणतेही भाष्य अजूनही केले नसल्याने, सलमानचा डबल रोल खरंच असणार आहे की नाही हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे.
Comments are closed.