IPL 2026: आकाश चोप्राने निवडली CSK ची सर्वात खतरनाक प्लेइंग इलेव्हन! अंतिम 11 मध्ये या धडाकेबाज खेळाडूंचा समावेश

येत्या काही दिवसांत इंडियन प्रीमियर लीगचा (Indian premiere league Season 19) 19 वा हंगाम सुरू होत आहे. 28 मार्च रोजी होणाऱ्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) आमनेसामने येतील. यावेळेस चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ विशेष चर्चेत आहे, कारण संघात संजू सॅमसनची (Sanju Samson) एन्ट्री झाली आहे. एम.एस. धोनीची क्रेझ तर नेहमीप्रमाणेच आहे, पण सर्वांना उत्सुकता आहे की चेन्नई कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार? माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन निवडून याचे उत्तर दिले आहे.
आकाश चोप्राच्या मते, चेन्नई सुपर किंग्समध्ये संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे यांच्यावर ओपनिंगची जबाबदारी दिली जाऊ शकते. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. गेल्या हंगामात म्हात्रेने ओपनर म्हणून 7 सामन्यांत 240 धावा केल्या होत्या. आकाश चोप्राच्या अंदाजानुसार, म्हात्रे-सॅमसन जोडीनंतर गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर आणि डेवाल्ड ब्रेविस चौथ्या क्रमांकावर फलंदाजी सांभाळतील.
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अनेक प्रभावी खेळी करणारा शिवम दुबे मधल्या फळीचा कणा असेल. चोप्रा यांच्या मते, चेन्नई व्यवस्थापन कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर या दोघांनाही संधी देऊ शकते. मिनी ऑक्शनमध्ये सुपर किंग्सने कार्तिक आणि प्रशांत या दोघांवर प्रत्येकी 14.2 कोटी रुपयांची बोली लावली होती. एम.एस. धोनी (M. S. Dhoni) गेल्या हंगामाप्रमाणेच याही वेळी 8 व्या क्रमांकावर येऊन ‘फिनिशर’ची भूमिका बजावू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस (Nathan Ellis) दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. अशा स्थितीत गोलंदाजीची धुरा नूर अहमद, खलील अहमद आणि मॅट हेन्री यांच्या खांद्यावर असेल. जर प्रशांत वीरला संधी मिळाली, तर तो संघाचा दुसरा मुख्य फिरकीपटू म्हणून समोर येऊ शकतो; तो डाव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो.
आकाश चोप्राने निवडलेली CSK ची ‘प्लेइंग इलेव्हन’: संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, एम.एस. धोनी, नूर अहमद, खलील अहमद, मॅट हेन्री.
Comments are closed.