IND vs ENG; दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान मिळणार का?

(भारत विरूद्ध इंग्लड) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना नागपूरच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. दरम्यान भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नागपूरच्या मैदानावर झालेल्या पहिल्या वनडेत शानदार फलंदाजी केली होती. त्याने अर्धशतक झळकावत भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. पण भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या वनडेतून बाहेर असल्यामुळे अय्यरला संघात संधी मिळाली होती. पण आता असे प्रश्न उपस्थित होत आहेत की, कटकमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यर खेळणार का?

पहिल्या वनडे सामन्यापूर्वी विराट कोहलीला (Virat Kohli) दुखापत झाली होती. त्यामुळे श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संघामध्ये संधी देण्यात आली होती. दरम्यान अशी माहिती समोर आली होती की, सामन्यापूर्वी अय्यर चित्रपट बघत होता, पण अचानक कर्णधार रोहित शर्माने त्याला फोन करून सांगितले की, तुझा भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जात आहे. दरम्यान अय्यरने मैदानात आपली छाप पाडत श्रेयस 36 चेंडूत 59 धावा कुटल्या.

विराट कोहलीच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल बीसीसीआयकडून (BCCI) अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण माध्यमांकडून सांगितले जात आहे की, कटक मधील दुसऱ्या वनडेत कोहली फिट होऊ शकतो, जर तो दुसऱ्या सामन्यात खेळला तर भारतीय संघातील कोणत्याही एका खेळाडूला संघाबाहेर जावे लागू शकते. किंवा श्रेयस अय्यरला देखील संघाबाहेर जावे लागू शकते. पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

दोन्ही संघातील पहिला वनडे सामना नागपूरच्या स्टेडियमवर खेळला गेला. दरम्यान भारताने इंग्लंडवर वर्चस्व गाजवत 4 विकेट्सने सामना जिंकला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 248 धावा केल्या. नंतर भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना 38. 4 षटकात विजय मिळवला. आता भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs ENG; दुसऱ्या वनडेत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार? कशी असेल कटकची खेळपट्टी? जाणून घ्या एका क्लिकवर
ग्लेन फिलिप्सचा तडाखा, शाहीनची धुलाई! शेवटच्या षटकात चाैकार-षटकरांचा पाऊस
फिलिप्सने पाकिस्तानला ठोकले! शतकी खेळीने शेवटच्या षटकांत सामन्याची दिशा बदलली

Comments are closed.