टीम इंडियाला मिळणार परदेशी स्पॉन्सर? मोठी अपडेट समोर

भारत सरकारने ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी नवीन कायदा आणल्यानंतर ड्रीम 11सह अनेक कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर बीसीसीआय आणि ड्रीम 11 मधील स्पॉन्सरशिप संपुष्टात आली आहे. आता बीसीसीआय नवीन स्पॉन्सर शोधत आहे. अशा परिस्थितीत आशिया कप 2025पूर्वी कोणती तरी विदेशी कंपनी भारतीय टीमची स्पॉन्सर होऊ शकते.

टीम इंडियाच्या जर्सीवर आता ड्रीम 11चे नाव दिसणार नाही, कारण बीसीसीआय आणि टीमची डील संपुष्टात आली आहे. अशा परिस्थितीत बोर्ड आशिया कप 2025पूर्वी नवीन स्पॉन्सर शोधत आहे. एनडीटीव्हीच्या माहितीनुसार, टोयोटाने भारताची जर्सी स्पॉन्सर होण्यास स्वारस्य दाखवले आहे. जर टोयोटा आणि बीसीसीआय यांच्यात डील झाली, तर टीम इंडियाच्या जर्सीवर आता टोयोटाचे नाव दिसेल.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि ड्रीम 11 यांच्यात तीन वर्षांसाठी हा करार झाला होता. 2023 मध्ये पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर हा लोगो दिसला होता आणि ही डील टी-20 वर्ल्ड कप 2026 पर्यंत चालणार होती. पण आता भारतात मनी गेमिंगवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ड्रीम 11ला मोठा तोटा सहन करावा लागला. लक्षात घ्या की ड्रीम 11 आणि बीसीसीआय यांच्यातील तीन वर्षांची डील 358 कोटी रुपयांमध्ये झाली होती.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, बीसीसीआय असा कोणताही प्रयत्न करणार नाही, ज्याची परवानगी भारत सरकार किंवा देशाचा कायदा देत नाही. देवजीत सैकियाने स्पष्टपणे म्हटले की, आम्ही देशाच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणार नाही. ड्रीम 11चे मूल्य सुमारे 8 अब्ज डॉलर आहे. भारत सरकारच्या नवीन कायद्याप्रमाणे, जो कोणी अशा प्रकारचे गेम मार्केटमध्ये आणेल, त्याला तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होईल आणि एक कोटी रुपयांचा दंडही भरावा लागेल.

Comments are closed.