खराब नेट रन रेटमुळे टीम इंडिया जाणार स्पर्धेतून बाहेर?, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी धक

T20 विश्वचषक 2026 भारताच्या उपांत्य फेरीची परिस्थिती : टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलची शर्यत आता रंगतदार झाली आहे. भारताने झिम्बाब्वे विरुद्ध दमदार विजय मिळवला असला, तरी समीकरणे अजूनही गुंतागुंतीचीच आहेत. ग्रुप 1 मधून दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे, तर ग्रुप 2 मधून इंग्लंड आधीच अंतिम चारमध्ये पोहोचला आहे.

सेमीफायनलच्या 2 जागा भरल्या, 2 अजून शिल्लक…

आतापर्यंत दोन संघांनी सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले आहे, मात्र उर्वरित दोन जागांसाठी जबरदस्त चुरस सुरू आहे. झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांनी विजय मिळवूनही भारताची वाट अजून खडतरच आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सुपर-8 मधील अखेरच्या सामन्यात 1 मार्च रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध लढत द्यावी लागणार आहे.

भारतासाठी ‘करो या मरो’ सामना

भारताला अंतिम चारमध्ये पोहोचायचे असेल, तर वेस्ट इंडीजविरुद्ध विजय अनिवार्य आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. मात्र, जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर नेट रन रेटच्या जोरावर वेस्ट इंडीजला फायदा होईल आणि भारताचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय मिळूनही भारतीय गोलंदाजांनी 184 धावा दिल्याने नेट रन रेट प्लसमध्ये आणता आलेला नाही. त्यामुळे भारतासाठी हा सामना अक्षरशः ‘जिंकायलाच हवा’ असा बनला आहे.

सामना रद्द झाला तर भारत बाहेर?

होय… जर भारत-वेस्ट इंडीज सामना पावसामुळे रद्द झाला, तर चांगल्या नेट रन रेटमुळे वेस्ट इंडीज सेमीफायनलमध्ये जाईल आणि भारत स्पर्धेबाहेर होईल. त्यामुळे भारतीय चाहत्यांचे लक्ष आता हवामानावरही लागले आहे.

दुसऱ्या गटात न्यूझीलंड-पाकिस्तानमध्ये पेच

ग्रुप 2 मधून इंग्लंडने सलग दोन विजयांसह सेमीफायनल गाठले आहे. न्यूझीलंड ने दोन सामन्यांत एक विजय मिळवला आहे, तर पाकिस्तान विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. न्यूझीलंडचा अखेरचा सामना 27 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध आहे. जर न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत केले, तर त्यांचा सेमीफायनलचा मार्ग सुकर होईल. सध्या त्यांचा नेट रन रेट (+3.050) मजबूत आहे.

पाकिस्तानची संधी अजून जिवंत

पाकिस्तानच्या खात्यात दोन सामन्यांनंतर फक्त एक गुण आहे. 28 फेब्रुवारीला त्यांचा सामना श्रीलंका विरुद्ध होणार आहे. जर पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत केले, तर त्यांचे गुण तीन होतील. मात्र, त्याचबरोबर पाकिस्तानला इंग्लंडने न्यूझीलंडला हरवावे, अशी प्रार्थनाही करावी लागेल. पाकिस्तान जिंकला आणि न्यूझीलंड हरला, तर चांगल्या नेट रन रेटच्या आधारे सेमीफायनलचे तिकीट ठरेल.

हे ही वाचा –

ENG vs NZ Match : एक सामना… दोन समीकरणं… अन् पाकिस्तानचं टांगणीला लागलेलं स्वप्न! इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड ठरवणार भविष्य

आणखी वाचा

Comments are closed.